101, 105, 108, 123, Ruturaj Gaikwad ची सेंचुरी ठरते डोकेदुखी, तब्बल 4 वेळा झालय टीमला नुकसान
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
भारत vs साउथ आफ्रिका यांच्यातील सामन्यात भारताच्या दोन खेळाडूंनी सेंचुरी केली आणि भारताने 359 धावांचा लक्ष साऊथ आफ्रिकेसमोर ठेवलं. पण एवढी मोठी धावसंख्या समोर असूनही साउथ आफ्रिकेच्या संघाने बाजी मारली आणि हा सामना जिंकला.
advertisement
advertisement
पण या सगळ्यानंतर आता एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. टीम इंडियामध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी कोणत्याही फलंदाजासाठी मोठ्या खेळी खेळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः भारतासाठी खेळताना शतक करणे हे प्रत्येक फलंदाजाचे स्वप्न असते. विजय मिळवून देणारे शतक हे खूप आनंददायी असते. पण हेच शतक जर संघासाठी दुर्दैवी ठरत असेल तर?
advertisement
हो, काल खेळल्या गेलेल्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने शतक ठोकल. पण जेव्हा जेव्हा ऋतुराजने शतकी खेळी खेळली आहे तेव्हा तेव्हा पराभव झाला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय सामन्यातही असेच काही घडले, जिथे गायकवाडने शानदार खेळी केली पण टीम इंडियाचा पराभव झाला आणि हे पहिल्यांदाच घडले आहे असे नाही.
advertisement
advertisement
advertisement
28 नोव्हेंबर 2023 रोजी, गुवाहाटी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सामन्यात, गायकवाडने 123 धावा केल्या, जे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक होते. तथापि, ग्लेन मॅक्सवेलच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाने 223 धावांचे लक्ष्य गाठले. टी-20 मध्ये भारताविरुद्धचा हा सर्वाधिक यशस्वी धावांचा पाठलाग आहे.


