Marathi Horror Film : रहस्य अन् थरारक खेळ! देवदत्त नागेचा मराठी हॉरर सिनेमा, या दिवशी थिएटरमध्ये
- Published by:Minal Gurav
Last Updated:
हॉरर सिनेमा आणि तो ही मराठीत... देवदत्त नागे, कुशल बद्रिकेसह मोठी स्टारकास्ट सिनेमात दिसणार आहे. सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे.
मागच्या काही वर्षात मराठीतही हॉरर सिनेमे येऊ लागले आहे. अल्याड पल्याड हा सिनेमा मागील वर्षी पुन्हा एकदा रिलीज करण्यात आला. असंभव, जारण सारखे सिनेमे आणि सीरिज देखील प्रेक्षकांना आवडल्या. जून महिन्यात थिएटरमध्ये आणखी एक मराठी हॉरर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेता देवदत्त नागे, कुशल बद्रिके, संदीप पाठक हे कलाकार यात प्रमुख भूमिकेत असणार आहे. सिनेमाचा पहिला टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.
'युनिव्हर्स' संकल्पनेची आता मराठी चित्रपटसृष्टीतही दमदार एंट्री होत आहे. युनिव्हर्स चित्रपट प्रेक्षकांना थरार आणि रहस्य याचा रंजक सिनेमॅटिक अनुभव देणार घबाडकुंड हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 'अल्याड पल्याड' चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील घबाडकुंड प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. भय, थरार, रहस्य असा भरगच्च मसाला असलेला ‘घबाडकुंड’ चित्रपट सादरीकरणाच्या दृष्टीने प्रेक्षकांसाठी स्पेशल ट्रीट असणार आहे.
advertisement
आयुष्यात अनपेक्षित घटनांनी काहींच्या स्वप्नांना पंख फुटतात, पण त्याचवेळी पडद्यामागे सुरू असतो संशय आणि संकटांचा भयानक खेळ. भीती आणि अनिश्चिततेच्या छायेत घडणाऱ्या अकल्पित घटनांमुळे कथानक प्रत्येक टप्प्यावर नवे प्रश्न उभे करते. सत्याच्या शोधात निघालेल्यांना कोणत्या गोष्टीला सामोरे जावे लागते? आणि शेवटी नशिब जिंकतं की माणूस? हे घबाडकुंड सिनेमात पाहायला मिळणार आहे.
advertisement
advertisement
या हॉरर सिनेमात अभिनेता देवदत्त नागे, कुशल बद्रिके, संदीप पाठक, शशांक शेंडे, प्राजक्ता हनमघर, स्मिता पायगुडे-अंजुटे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर, योगेश प्रकाश तनपुरे, साहिल अनलदेवर आदि कलाकारांची दमदार फौज आहे.
'घबाड़कुंड' सिनेमा मराठीसह दाक्षिणात्य भाषांमध्ये सुद्धा रिली होणार आहे. सिनेमाचं लेखन संजय नवगिरे, अक्षय धरमपाल यांचे आहे. गीतकार नयूम पठाण आहेत. कलादिग्दर्शन योगेश इंगळे, छायांकन योगेश कोळी तर संकलन सौमित्र धाराशिवकर यांचे आहे. साऊथचे प्रसिद्ध फाईट मास्टर कार्तिक यांनी या चित्रपटासाठी बॅकग्राउंड म्युझिकची जबाबदारी अभिनय जगताप यांनी सांभाळली आहे. रि-रेकॉर्डिंग मिक्सर सुजित शिनगारे व साउंड डिझाइन मानव श्रोत्रिय (एम पी एस सी) यांचे आहे. मॅनेजर विष्णु घोरपडे आहेत. हा सिनेमा 19 जून रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 09, 2026 7:46 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Marathi Horror Film : रहस्य अन् थरारक खेळ! देवदत्त नागेचा मराठी हॉरर सिनेमा, या दिवशी थिएटरमध्ये










