भारत-पाकिस्तान सामना 15 फेब्रुवारीला, टीम इंडियाच्या उरलेल्या 4 मॅच कधी? T20 वर्ल्ड कपचं शेड्यूल आताच सेव्ह करा!

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या वेळापत्रकाची आयसीसीकडून घोषणा करण्यात आली आहे. 7 फेब्रुवारी ते 8 मार्चदरम्यान भारत आणि श्रीलंकेमध्ये टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं आहे.
1/7
मागच्या टी-20 वर्ल्ड कपप्रमाणेच यंदाही एकूण 20 टीम सहभागी झाल्या आहेत. या टीमना 5-5 च्या 4 ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. ग्रुप ए मध्ये भारत, पाकिस्तान, युएसए, नेदरलँड्स आणि नामिबिया यांचा समावेश आहे.

advertisement
2/7
तर ग्रुप बीमध्ये ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयर्लंड, ओमान आणि झिम्बाब्वे आहेत. ग्रुप सीमध्ये इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, नेपाळ आणि इटली, ग्रुप डीमध्ये न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, कॅनडा आणि युएई आहेत.

3/7
टी-20 वर्ल्ड कपमध्ये यंदाही भारत आणि पाकिस्तान यांना एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आलं आहे. भारत आणि पाकिस्तानचा सामना 15 फेब्रुवारीला कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. तर स्पर्धेत टीम इंडिया उरलेले सामने युएसए, नामिबिया, नेदरलँड्सविरुद्ध खेळेल.

4/7
टी-20 वर्ल्ड कपची सुरूवातच भारताच्या सामन्याने होणार आहे. 7 फेब्रुवारी 2026 ला भारत आणि युसए यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पहिला सामना होईल. यानंतर 12 फेब्रुवारीला भारत आणि नामिबिया यांचा दिल्लीत सामना खेळला जाईल.

5/7
15 फेब्रुवारीला कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर भारत-पाकिस्तान महामुकाबला रंगेल. तर ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाचा शेवटचा सामना 18 फेब्रुवारीला नेदरलँड्सविरुद्ध अहमदाबादमध्ये होईल.

6/7
4 ग्रुपमधल्या टॉप-2 टीम सुपर 8 मध्ये प्रवेश करतील. सुपर-8 मधल्या टॉप-4 टीम सेमी फायनल खेळतील. पहिली सेमी फायनल 4 मार्चला कोलकाता किंवा कोलंबोमध्ये होईल. तर दुसरी सेमी फायनल 5 मार्चला मुंबईमध्ये खेळवली जाईल. 8 मार्चला अहमदाबादमध्ये टी-20 वर्ल्ड कपची फायनल होईल.

7/7
पाकिस्तानची टीम सेमी फायनल आणि फायनलला क्वालिफाय झाली तर पहिली सेमी फायनल कोलंबो आणि फायनलही कोलंबोमध्ये होईल. पाकिस्तानने भारतात खेळायला नकार दिल्यामुळे पाकिस्तानचे सगळे सामने श्रीलंकेमध्ये होणार आहेत.

ZP Election : महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी होणार? सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितलं...
महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी?कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं
  • महापालिका–जिल्हा परिषद निवडणुका कधी?कोर्टात निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं

View All
advertisement