घे भरारी! शेतमजूर महिलेनं करून दाखवलं, महाराष्ट्रात फेमस झालाये हा ब्रँड!

Last Updated:
Success Story: कधीकाळी शेतमजूर म्हणून काम करणाऱ्या संगीता घोडके यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. अडीच एकर शेतीतून त्या तिहेरी उत्पन्न घेत आहेत.
1/7
सध्याच्या काळात काही महिला देखील उद्योग क्षेत्रात मोठं नाव कमावत आहेत. जालना जिल्ह्यातील धारकल्याण येथील संगीता घोडके यांची कहाणी देखील अशीच आहे. दाल मिल उद्योग, शेळीपालन आणि मत्स्यपालनाच्या माध्यमातून दरवर्षी 10 लाखांपेक्षा अधिक निव्वळ उत्पन्न त्या मिळवतात.

advertisement
2/7
उमेद अभियानाने दिलेली साथ आणि कुटुंबाच्या पाठिंब्याने त्यांनी हा यशाचा टप्पा पार केलाय. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन एसबीआय फाऊंडेशनने राज्यातून दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस संगीता घोडके यांना दिले आहे. 6 लाख रुपये रोख, सोन्याचे झुंबर, सोन्याची नथ आणि रेशमी साडी असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लोकल 18 ने संगीता घोडके यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाविषयी जाणून घेतलं.

3/7
जालना जिल्ह्यातील धारकल्याण या छोट्याशा खेडेगावात संगीता घोडके राहतात. त्याचे शिक्षण केवळ दहावीपर्यंत झाले. घरी केवळ अडीच एकर शेत जमीन. त्यामुळे लग्न झाल्यानंतर स्वतःच्या शेतातील कामे आटोपून दुसऱ्याच्या शेतावर मजूर म्हणून देखील त्यांनी काम केलं. 2015 मध्ये त्या बचत गट आणि उमेद अभियानाशी जोडल्या गेल्या.

4/7
2020 पर्यंत संगीता या केवळ बचत आणि आर्थिक देवाण-घेवाण या स्तरावर काम करत होत्या. मात्र 2021 पासून त्यांनी उमेद अभियानाच्या अंतर्गत विविध लाभ घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला पोखरा योजनेअंतर्गत दाल मिल व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला असंख्य अडचणी आल्या. ब्रँड नाव नसल्याने साध्या पॅकिंगमध्ये डाळ विकली. उमेदच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने जालना जीविका नावाने सेंद्रिय डाळींचा ब्रँड उभा केला.

5/7
सध्या त्यांच्याकडे जालना शहरातून तसेच ग्रामीण भागात तुरीपासून डाळ तयार करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऑर्डर्स येतात. शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन तसेच शेतात असलेल्या शेततळ्यात मत्स्यपालन हा व्यवसाय देखील सुरू केला.

6/7
या तिन्ही व्यवसायातून दरवर्षी त्यांना 10 लाखांपेक्षा अधिकचा निव्वळ नफा होतो. 3 उद्योग यशस्वीपणे चालवून त्या माध्यमातून चांगला आर्थिक फायदा मिळवणाऱ्या संगीता बुडके यांची दखल ‘घे भरारी मला पंख मिळाले’ या अंतर्गत एसबीआय फाऊंडेशनने घेतली आणि त्यांना राज्यस्तरीय दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक दिलं.

7/7
यशस्वी उद्योजिका म्हणून मला घडवण्यात उमेद अभियान आणि कुटुंबाचा पाठिंबा यांचा मोठा वाटा असल्याचे संगीता घोडके यांनी सांगितलं. एका दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या महिलेला उद्योजक आणि एक चांगलं माणूस म्हणून उमेदने मला घडवलं अशा भावना त्या व्यक्त करतात. इतर महिला उद्योजिकांसाठी संगीता घोडके यांची ही कहाणी नक्कीच प्रेरणादायी आहे. (नारायण काळे, प्रतिनिधी)

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement