Apple iPhone 15 च्या किंमतीत घसरण! पहा कुठे मिळतोय स्वस्तात
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Apple iPhone 15 Price Drop in India: तुम्ही आयफोन 15 चा 128 जीबी व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. तुम्ही आयफोन 15 स्वस्तात खरेदी करू शकता. चला जाणून घेऊया ऑफर्स आणि डील्सबद्दल.
Apple iPhone 15 Price Drop in India: दिग्गज टेक कंपनी Apple चा नवीन फोन सप्टेंबर 2025 मध्ये लाँच केला जाऊ शकतो. आयफोन 17 सीरीज भारतीय बाजारपेठेत तसेच इतर देशांमध्ये लाँच केली जाऊ शकते. तसंच, त्यापूर्वी विद्यमान मॉडेल सवलतीसह खरेदी करण्याची संधी आहे. तुम्ही आयफोन 17 डिस्काउंटसह खरेदी करू शकता. तर, आयफोन 15 खरेदी करणाऱ्यांसाठी देखील एक चांगली संधी आहे कारण त्याच्या किमतीवर थेट 5000 रुपयांची सूट मिळत आहे. चला जाणून घेऊया तुम्ही आयफोन 15 कसा आणि कुठून मोठ्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता?
advertisement
advertisement
iPhone 15 Price Discount Offer : आयफोन 15 चा 128 GB व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 7 टक्के डिस्काउंटसह लिस्टेड आहे. तुम्हाला त्याच्या किंमतीवर थेट 5000 रुपयांची सूट मिळू शकते. कोणतीही ऑफर लागू न करता, iPhone 15 चा 128 GB व्हेरिएंट 69,900 रुपयांऐवजी 64,900 रुपयांचा आहे. बँक आणि एक्सचेंज ऑफर देखील दिल्या जात आहेत, त्यानंतर iPhone 15 ची किंमत आणखी कमी केली जाऊ शकते.
advertisement
iPhone 15 Bank Offers : तुम्ही बँक ऑफर लागू केली तर तुम्हाला iPhone 15 च्या किमतीवर अतिरिक्त सूट मिळू शकते. नो कॉस्ट EMI व्यवहार सुविधा उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 5 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. याशिवाय, तुम्हाला इतर क्रेडिट आणि डेबिट कार्डने पेमेंट केल्यासही सूट मिळू शकते. निवडक बँकांच्या क्रेडिटवर 3000 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे.
advertisement
iPhone 15 Exchange Offers : फोन एक्सचेंजसाठी उपलब्ध असेल तर तुम्हाला एक्सचेंज बोनसद्वारे सूट मिळू शकते. फ्लिपकार्टद्वारे आयफोन 15 वर तुम्हाला 48,150 रुपयांची एक्सचेंज सूट मिळू शकते. अटी आणि शर्तींनुसार, एक्सचेंज केल्या जाणाऱ्या फोनची स्थिती चांगली असावी आणि तो लेटेस्ट मॉडेलच्या यादीत देखील आला पाहिजे. याशिवाय, तुम्हाला अॅपलच्या निवडक आयफोन एक्सचेंजवर अधिक एक्सचेंज सूट मिळू शकते.