advertisement

पतीला सोडून नम्रता शाहरूखसोबत लिव्ह इनमध्ये राहिली अन् गेम झाला; पुण्यातील त्या हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण

Last Updated:

नम्रताचे दोन वर्षांपूर्वी शैलेंद्र प्रकाश व्हटकर (३०) याच्याशी लग्न झाले होते. मात्र, काही काळाने नम्रताचे तिच्यासोबत कंपनीत काम करणाऱ्या शाहरूख पठाण याच्याशी प्रेमसंबंध निर्माण झाले

पतीने केली हत्या (AI Image)
पतीने केली हत्या (AI Image)
पुणे : पुणे जिल्ह्यातील नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई परिसरात चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीची चाकूने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून, अनैतिक संबंधांच्या संशयातून हा रक्तरंजित प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
मयत महिलेचे नाव नम्रता शैलेंद्र व्हटकर (१९) असे आहे. नम्रताचे दोन वर्षांपूर्वी शैलेंद्र प्रकाश व्हटकर (३०) याच्याशी लग्न झाले होते. मात्र, काही काळाने नम्रताचे तिच्यासोबत कंपनीत काम करणाऱ्या शाहरूख पठाण याच्याशी प्रेमसंबंध निर्माण झाले. याच कारणावरून पती-पत्नीत वारंवार वाद होत होते. दोन महिन्यांपूर्वी नम्रता पतीला सोडून शाहरूखसोबत राहण्यास गेली होती.
advertisement
दागिने मागितले अन् घात झाला: गुरुवारी (२२ जानेवारी) नम्रताने तिचे सोन्याचे दागिने परत मिळवण्यासाठी पती शैलेंद्रशी संपर्क साधला. शैलेंद्रने तिला दागिने देण्याच्या बहाण्याने वाडेबोल्हाई मंदिराजवळ बोलावून घेतले. नम्रता आणि शाहरूख तिथे पोहोचले असता, शैलेंद्रने वादाचे रूपांतर हाणामारीत केले. संतापलेल्या शैलेंद्रने खिशातून चाकू काढून नम्रतावर सपासप वार केले.
advertisement
नम्रताचा आरडाओरडा ऐकून शाहरूख त्या ठिकाणी धावला, मात्र तोपर्यंत शैलेंद्र पसार झाला होता. गंभीर जखमी अवस्थेत नम्रताला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी शाहरूख पठाण याने दिलेल्या फिर्यादीवरून लोणीकंद पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपी पती शैलेंद्र व्हटकर याला बेड्या ठोकल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पतीला सोडून नम्रता शाहरूखसोबत लिव्ह इनमध्ये राहिली अन् गेम झाला; पुण्यातील त्या हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement