Googleच्या या जबरदस्त फोनची किंमत ₹9000 रुपयांनी झाली कमी! बँक डिस्काउंटही वेगळं
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Google Pixel 9a अॅमेझॉनवर ₹9,500 हून जास्त सूटसह खरेदी केला जाऊ शकतो. बँक ऑफर, नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज डीलसह या Pixel 9a ची किंमत अजुनही कमी होऊ शकते. जाणून घेऊया पूर्ण ऑफर्स आणि फीचर्सविषयी...
तुम्ही मिड-रेंज सेगमेंटमध्ये एखादा स्वच्छ अँड्रॉइड एक्सपीरियन्स, जबरदस्त कॅमेरा आणि विश्वासार्ह परफॉर्मेंस देणारा स्मार्टफोन शोधत असाल तर Pixel 9a हा सध्या शानदार ऑप्शन आहे. चांगली गोष्ट म्हणजे हा फोन सध्या Amazon वर जबरदस्त सूटसह उपलब्ध आहे. ज्यामुळे याची किंमत पहिल्याच्या तुलनेत खुप कमी झाली आहे.
advertisement
Google Pixel 9a भारतात 49,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला होता. तसंच, हा फोन सध्या Amazon वर फक्त 40,490 रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे, जो सुमारे 9,500 रुपयांचा थेट डिस्काउंट दाखवतो. याव्यतिरिक्त, एचडीएफसी बँक आणि स्कॅपिया फेडरल बँक क्रेडिट कार्डसह निवडक बँक कार्डवर 5% पर्यंत इंस्टेंट डिस्काउंट देखील उपलब्ध आहे. या बँक ऑफरमुळे किंमत आणखी कमी होऊ शकते.
advertisement
शिवाय, Amazon वर नो-कॉस्ट EMI ऑप्शन देखील उपलब्ध आहेत, ज्याची सुरुवात दरमहा ₹1,400 पासून होते. जे लोक त्यांचा जुना फोन एक्सचेंज करू इच्छितात त्यांच्यासाठी एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहेत. फोनच्या स्थिती आणि मॉडेलनुसार, तुम्हाला त्या बदल्यात मोठी रक्कम मिळू शकते, ज्यामुळे Pixel 9a आणखी स्वस्त होतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement










