सरकारचा इशारा! लगेच डिलीट करा हे अॅप्स, बँक अकाउंट होऊ शकतं रिकामं
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
सायबर गुन्हेगारांपासून वाचण्यासाठी स्मार्टफोन यूझर्सना त्यांच्या फोनमधून काही अॅप्स काढून टाकण्याचा सल्ला सरकारने दिला आहे.
advertisement
विशेषतः स्क्रीन शेअरिंग अ‍ॅप्स टाळा : सरकारने म्हटले आहे की अनेक स्क्रीन शेअरिंग अ‍ॅप्स, जसे की AnyDesk, TeamViewer, QuickSupport, इत्यादींचा वापर सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी करत आहेत. हे अ‍ॅप्स तुमच्या फोनवर रिअल-टाइम अ‍ॅक्सेस दुसऱ्याला देऊ शकतात, जे तुमच्या बँकिंग क्रियाकलाप, OTP आणि पर्सनल माहिती सहजपणे पाहू शकतात.
advertisement
फसवणूक कशी होते? : जेव्हा एखादा यूझर स्क्रीन शेअरिंग अ‍ॅप इन्स्टॉल करतो तेव्हा हे अ‍ॅप्स अनेक प्रकारच्या परमिशन मागतात. बहुतेक यूझर्स त्यांना विचार न करता परमिशन देतात. यानंतर, गुन्हेगार यूझर्सची स्क्रीन लाईव्ह पाहू शकतात आणि बँकिंग व्यवहारादरम्यान OTP आणि पासवर्डसारखी संवेदनशील माहिती चोरू शकतात.
advertisement
advertisement
या खबरदारी घ्या: कोणत्याही अज्ञात लिंक किंवा कॉलद्वारे अ‍ॅप्स डाउनलोड करू नका. विश्वसनीय संस्थेने आवश्यक असल्याशिवाय स्क्रीन शेअरिंग अ‍ॅप्स इन्स्टॉल करू नका. सोशल मीडियावर तुमची गोपनीयता सेटिंग्ज मजबूत करा आणि तुमची पर्सनल माहिती मर्यादित प्रमाणात शेअर करा. बँकिंग सर्व्हिस वापरताना कोणालाही स्क्रीन अ‍ॅक्सेस देऊ नका.
advertisement
advertisement


