Smart TV अपडेट करताय? एक चूक पडू शकते महागात, घ्यावा लागेल नवा टीव्ही

Last Updated:
Smart TV: स्मार्ट टीव्ही अपडेट करणे वाटते तितके सोपे नाही. मोबाईल फोन अपडेट म्हणून विचार करणे ही एक मोठी चूक असू शकते.
1/7
मुंबई : स्मार्ट टीव्ही अपडेट करणे वाटते तितके सोपे नाही. मोबाईल फोन अपडेट म्हणून विचार करणे ही एक मोठी चूक असू शकते. कारण टीव्हीच्या सॉफ्टवेअरमधील एक छोटीशी चूक देखील संपूर्ण सिस्टम खराब करू शकते. ज्यामुळे तुम्हाला नवीन टीव्ही खरेदी करावा लागू शकतो. म्हणून, अपडेट करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे.

advertisement
2/7
टीव्हीमध्ये सुरक्षा अपडेट का दिले जातात असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर. बग सुरक्षा त्रुटी दूर करण्यासाठी आणि जुने फीचर सुधारण्यासाठी टीव्हीला अपडेट दिले जातात. तुमच्या टीव्हीला साउंड, पिक्चर किंवा प्रायव्हसीमध्ये काही समस्या येत असतील, तर कंपनी अपडेटद्वारे त्या दुरुस्त करते. शिवाय, कालांतराने, हॅकर्स अँड्रॉइड सिस्टममधील कमकुवत गोष्टींना टार्गेट करतात, ज्यामुळे सुरक्षा अपडेट्स महत्त्वपूर्ण बनतात. या सर्व कारणांमुळे, तुमचा टीव्ही नियमितपणे अपडेट करणे आवश्यक मानले जाते.

3/7
स्मार्ट टीव्ही अपडेट करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्थिर इंटरनेट कनेक्शन. अपडेट दरम्यान इंटरनेट गेल्यास, अपडेटमध्ये समस्या येऊ शकते आणि टीव्हीचा संपूर्ण ओएस खराब होऊ शकतो. अनेक प्रकरणांमध्ये, यामुळे मदरबोर्डलाही नुकसान होऊ शकते. म्हणून, स्थिर कनेक्शन सुनिश्चित करण्यासाठी अपडेट दरम्यान टीव्हीला LAN केबलशी जोडण्याचा प्रयत्न करा.

4/7
तुमच्या परिसरात वीज गेली तर टीव्हीला इन्व्हर्टरशी जोडलेल्या पॉवर आउटलेटशी जोडा. अपडेटमध्ये प्रॉब्लम आला तर टीव्हीचे सॉफ्टवेअर जवळजवळ निश्चितच खराब होईल. म्हणून, अपडेट दरम्यान ते बंद होण्यापासून रोखणे अत्यंत महत्वाचे आहे.

5/7
बरेच लोक इंटरनेटवरून फर्मवेअर डाउनलोड करून त्यांच्या टीव्हीमध्ये नवीन फीचर्स जोडण्याचा प्रयत्न करतात. ही पद्धत अत्यंत धोकादायक आहे. कारण चुकीच्या मॉडेलमधील चुकीची फाइल किंवा फर्मवेअर टीव्हीला पूर्णपणे नुकसान पोहोचवू शकते. म्हणून, नेहमी टीव्ही कंपनीनेच दिलेला केलेले OTA अपडेट वापरा. ​​तुम्ही सेटिंग्ज > Software Update वर जाऊन नवीन OTA अपडेट चेक करु शकता.
Software Update वर जाऊन नवीन OTA अपडेट चेक करु शकता." width="1200" height="900" /> बरेच लोक इंटरनेटवरून फर्मवेअर डाउनलोड करून त्यांच्या टीव्हीमध्ये नवीन फीचर्स जोडण्याचा प्रयत्न करतात. ही पद्धत अत्यंत धोकादायक आहे. कारण चुकीच्या मॉडेलमधील चुकीची फाइल किंवा फर्मवेअर टीव्हीला पूर्णपणे नुकसान पोहोचवू शकते. म्हणून, नेहमी टीव्ही कंपनीनेच दिलेला केलेले OTA अपडेट वापरा. ​​तुम्ही सेटिंग्ज > Software Update वर जाऊन नवीन OTA अपडेट चेक करु शकता.
advertisement
6/7
अपडेट फाइल टीव्हीच्या स्टोरेजमध्ये सेव्ह केल्या जातात. म्हणून टीव्हीवर पुरेशी जागा असणं देखील खूप महत्त्वाचं आहे. मोठे अपडेट करण्यापूर्वी अनावश्यक अॅप्स काढून टाका. बहुतेक स्मार्ट टीव्हीमध्ये फक्त 1GB RAM असल्याने, सॉफ्टवेअर इंस्टॉलेशनमध्ये प्रॉब्लम येऊ नये म्हणून अपडेट सुरू करण्यापूर्वी सर्व बॅकग्राउंड अॅप्स बंद करा.

7/7
नवीन अपडेट इंस्टॉल झाल्यानंतर, टीव्ही पूर्णपणे बंद करा, काही मिनिटे वाट पहा आणि नंतर तो पुन्हा ऑन करा. अपडेटनंतर तुम्हाला काही प्रॉब्लम आल्यास, टीव्ही फॅक्टरी रीसेट करून पहा. यामुळे सॉफ्टवेअर नवीन सेटिंग्जसह स्थिरपणे काम करेल.

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी,  सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हणाले...
तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण
  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

View All
advertisement