Airtelच्या या यूझर्सला 6 महिने फ्री मिळेल 100gb क्लाउड स्टोरेज, तुम्हालाही मिळेल?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
भारती एअरटेल आणि गुगलने आज एक भागीदारीची घोषणा केली आहे. ज्या अंतर्गत एअरटेल यूझर्ससाठी गूगल वन क्लाउड स्टोरे मेंबरशिप सर्व्हिस उपलब्ध केली जाणार आहे.
नवी दिल्ली : भारती एअरटेल आणि गुगलने आज एका भागीदारीची घोषणा केली. ज्या अंतर्गत एअरटेल ग्राहकांना गुगल वन क्लाउड स्टोरेज सबस्क्रिप्शन सर्व्हिस फ्री मिळेल. ही सर्व्हिस ग्राहकांना मर्यादित डिव्हाइस स्टोरेजच्या समस्येला तोंड देण्यास मदत करेल असे दिसते. परंतु सर्व एअरटेल यूझर्सना हा फायदा मिळणार नाही. तर, फक्त पोस्टपेड आणि वाय-फाय यूझर्सना ही फ्री सेवा मिळेल. तसंच, कंपनी या यूझर्सना फक्त 6 महिन्यांसाठी 100 जीबी गुगल वन क्लाउड स्टोरेज मोफत देईल. ते हे स्टोरेज जास्तीत जास्त पाच इतर लोकांसोबत शेअर करू शकतात.
advertisement
स्टोरेज समस्यांना तोंड देणाऱ्या यूझर्सना दिलासा : एअरटेल आणि गुगलमधील या भागीदारीचा उद्देश यूझर्सच्या वाढत्या डेटा स्टोरेज समस्या सोडवणे आहे. यामुळे ग्राहकांना त्यांचे मौल्यवान फोटो, व्हिडिओ, कागदपत्रे आणि इतर डिजिटल कंटेंट साठवण्यासाठी पुरेशी जागा मिळेल आणि वारंवार फाइल्स डिलीट न करता किंवा महागडे फिजिकल स्टोरेज खरेदी न करता त्यांचा डेटा सुरक्षित राहील.
advertisement
advertisement
स्टोरेजच्या समस्या संपतील : भारती एअरटेलचे कनेक्टेड होम्सचे मार्केटिंग डायरेक्टर आणि सीईओ सिद्धार्थ शर्मा म्हणाले की, स्मार्टफोन आता पर्सनल आणि व्यावसायिक माहिती व्यवस्थापित करण्यासाठी एक महत्त्वाचे उपकरण बनले आहे. आणि यासह, स्मार्टफोन स्टोरेज त्यांच्यासाठी एक मोठी चिंता बनली आहे. आमच्या ग्राहकांना विश्वासार्ह, सुरक्षित आणि यूझर्स-अनुकूल स्टोरेज सोल्यूशन्स प्रदान करून ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही Google सोबत काम करत आहोत. या भागीदारीमुळे आमच्या लाखो पोस्टपेड आणि वाय-फाय ग्राहकांना 100 जीबी अतिरिक्त स्टोरेजचा फायदा होईल.
advertisement
advertisement
या ऑफरचा लाभ घेण्यासाठी, ग्राहकांना फक्त एअरटेल थँक्स अॅपमध्ये लॉग इन करावे लागेल आणि दावा करावा लागेल. सहा महिन्यांनंतर, 100 जीबी स्टोरेजसाठी दरमहा 125 रुपये इतके नाममात्र शुल्क ग्राहकाच्या मासिक बिलात जोडले जाईल. जर एखाद्या यूझर्सला सदस्यत्व सुरू ठेवायचे नसेल, तर तो/ती Google One सदस्यता रद्द करू शकते.