कॉकटेल की व्हिस्की? नशेच्या रेसमध्ये कोण भारी? वाइन एक्स्पर्टचं उत्तर ऐकून विचारात पडाल

Last Updated:
अनेकांना वाटतं की थेट दारु पिण्यापेक्षा कॉकटेल पिणं म्हणजे हलकं पेय, ज्यात अल्कोहोलचं प्रमाण कमी असतं. मात्र, वास्तव अगदी उलट आहे. काही कॉकटेल्समध्ये इतका स्ट्रॉन्ग अल्कोहोल असतो की ते थेट व्हिस्कीच्या मोठ्या पेगलाही मागे टाकतात.
1/7
बर्‍याच वेळा पार्ट्या, फेस्टिव्हल्स किंवा फ्रेंड्स गॅदरिंगमध्ये लोक बोलताना ऐकायला मिळतं की,  “मी दारू पीत नाही, फक्त कॉकटेल घेतो… त्यात काय असतं, फार काही नशा नाही होत.” पण खरंच असं आहे का? अनेकांना वाटतं की थेट दारु पिण्यापेक्षा कॉकटेल पिणं म्हणजे हलकं पेय, ज्यात अल्कोहोलचं प्रमाण कमी असतं. मात्र, वास्तव अगदी उलट आहे. काही कॉकटेल्समध्ये इतका स्ट्रॉन्ग अल्कोहोल असतो की ते थेट व्हिस्कीच्या मोठ्या पेगलाही मागे टाकतात.

advertisement
2/7
आता तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटलं असेल, पण हे खरं आहे. वाइन एक्स्पर्ट सोनल हॉलंड सांगतात की, लोकांची ही चुकीची समजूत त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यांच्या मते, प्रत्येक कॉकटेल “लाइट” असेलच असं नाही. काही लोकप्रिय कॉकटेल्समध्ये अल्कोहोलचं प्रमाण खूप जास्त असतं. उदाहरणार्थ, लाँग आयलंड आयस्ड टी (LIIT) किंवा नेग्रोनी सारख्या ड्रिंक्समध्ये एका मोठ्या व्हिस्की पेगपेक्षाही जास्त अल्कोहोल असू शकतं.

3/7
रंगावर नाही, अल्कोहोलवर लक्ष द्यासोनल हॉलंड स्पष्ट सांगतात की, कॉकटेलचा रंग किंवा त्याचं प्रेझेंटेशन पाहून त्याची नशा किती आहे हे समजत नाही. गोड, थंड, आकर्षक दिसणाऱ्या या पेयांमध्ये अनेक वेळा जास्त अल्कोहोल लपलेलं असतं. त्यामुळे “ही ड्रिंक सौम्य आहे” असा गैरसमज ठेवू नका.

4/7
कॉकटेलमधील गोडवा आणि भ्रमकॉकटेलमध्ये साखर, सोडा, ज्यूस किंवा इतर मिक्सर्स वापरले जातात. हे घटक अल्कोहोलची कडवट चव आणि शरीरात होणारी जळजळ कमी करतात. त्यामुळे ते सहज आणि पटकन प्यायलं जातं. पण अशा प्रकारे अल्कोहोल शरीरात अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात पोहोचतं आणि त्याचा परिणाम अधिक गंभीर होऊ शकतो.

5/7
किती वेगात पिता हेही महत्त्वाचंतुम्ही कॉकटेल किती हळू किंवा पटकन पिता, यावरही नशेचा परिणाम अवलंबून असतो. जे लोक हळूहळू पितात, त्यांचं शरीर अल्कोहोल हळू प्रक्रिया करतं. पण कॉकटेलमध्ये असलेलं विविध प्रकारचं अल्कोहोल जलद प्रभाव दाखवतं, त्यामुळे नशा अचानक चढते.

6/7
मर्यादा ओळखाकॉकटेल असो वा व्हिस्की अल्कोहोल कोणत्याही स्वरूपात घेतलं, तरी शरीरावर परिणाम होतोच. म्हणूनच आपली लिमिट ठरवणं खूप गरजेचं आहे. जरी कमी अल्कोहोल घेतलं तरी लिमिट ओलांडल्यावर हँगओव्हर किंवा डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे कॉकटेलसोबत पाणी पिणं आवश्यक आहे.

7/7
वाइन एक्स्पर्ट सोनल हॉलंड शेवटी सांगतात “कॉकटेल हे फक्त टेस्टसाठी किंवा कलरफुल दिसण्यासाठी बनवलेले नसतात. त्यात किती अल्कोहोल आहे हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण लाँग आयलंड आयस्ड टी (LIIT) किंवा नेग्रोनी सारख्या कॉकटेल्समधील अल्कोहोलचं प्रमाण अत्यंत जास्त असू शकतं. त्यामुळे चव उपभोगताना सावधगिरी बाळगा आणि मर्यादा ओलांडू नका.”

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement