Cockroaches : काय सांगता! झुरळ बनवतंय मालामाल, पण कसं काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Cockroaches : झुरळं ही आपल्या बहुतेक घरांमध्ये आढळणारी सर्वात सामान्य समस्या आहे. पण आता याच झुरळांमध्ये पैसे मिळतात असं सांगितलं तर...
advertisement
जरी आपण त्यांना कीटक समजतो, तरी जगभरातील अनेक देशांमध्ये त्याच्यापासून पैसे कमवले जातात. चीन आणि विशेषतः काही आफ्रिकन देश यामध्ये आघाडीवर आहेत. चीनमध्ये झुरळांच्या संगोपनासाठी खास बनवलेले फार्म आहेत. आफ्रिकेत लोक झुरळे थेट अन्न म्हणून खातात. आफ्रिकेतील कुपोषणाने ग्रस्त लोकांसाठी झुरळे हा एक प्रमुख अन्न स्रोत बनत आहेत. सध्या तेथील सुमारे 20 टक्के लोक झुरळांचे अन्न म्हणून सेवन करतात.
advertisement
जागतिक बँकेच्या मते, झुरळांची शेती आफ्रिकन खंडातील भूक, गरिबी आणि पर्यावरणीय संकटांसारख्या समस्यांवर उपाय ठरू शकते. कारण त्यांना वाढवण्यासाठी मोठे क्षेत्र, पाणी किंवा महागडे खाद्य आवश्यक नसते. झुरळांमध्ये प्रथिने, व्हिटॅमिन बी12, लोह आणि मॅग्नेशियमसारख्या अनेक पोषक तत्वांचा समावेश असतो. झुरळांमध्ये सुमारे 60-70 टक्के प्रथिने असतात, जी मांसासारखीच असतात. असा दावा केला जातो आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
टान्झानियातील डॅनियल रोहुरा या तरुणाने झुरळ पालनाला व्यवसायात रूपांतरित केलं आहे. तो एक किलो झुरळ 5 युरो म्हणजे सुमारे 450 ते 500 रुपयांना विकतो. झुरळांपासून काढलेलं तेलदेखील एक व्यवसाय आहे. आंतरराष्ट्रीय आकडेवारीनुसार, मानव आणि प्राण्यांसाठी अन्न म्हणून कीटकांची जागतिक बाजारपेठ 2030 पर्यंत 8 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 66000 कोटीपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. याचा अर्थ असा की भविष्यात जागतिक अन्न सुरक्षेत झुरळे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.