Happy New Year 2026 Photo : हॅप्पी न्यू इयर; Whatsapp Dp, Status, Instagram वर ठेवण्यासाठी खास फोटो

Last Updated:
Happy New Year 2026 Wishes Photo : तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देता येतील आणि तुमच्या सोशल मीडियावर नव्या वर्षाच्या स्वागतासाठीही ठेवता येतील असे हॅप्पी न्यू इअर फोटो.
1/7
आज जगभरात जे कॅलेंडर वापरलं जातं, त्याला ग्रेगोरियन कॅलेंडर म्हणतात. या कॅलेंडरनुसार 1 जानेवारी हा वर्षाचा पहिला दिवस मानला जातो. दरवर्षी 31 डिसेंबरच्या रात्री जुने वर्ष निरोप घेतं आणि 1 जानेवारीला नवीन वर्षाचं स्वागत होतं. हा क्षण जगभरातील लोकांसाठी उत्साह, आनंद आणि नव्या अपेक्षांनी भरलेला असतो. त्यामुळे भारतासह अनेक देशांमध्ये या दिवशी नवीन वर्ष साजरं केलं जातं.

advertisement
2/7
नवीन वर्ष साजरं करण्याची पद्धत देशानुसार वेगवेगळी असते. काही ठिकाणी मोठ्या फटाक्यांचा आतषबाजीत जल्लोष होतो, तर काही संस्कृतींमध्ये शांतपणे प्रार्थना करून नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. स्पेनमध्ये मध्यरात्री बारा वाजता बारा द्राक्षं खाण्याची परंपरा आहे. जपानमध्ये मंदिरात जाऊन मन:शांतीसाठी प्रार्थना केली जाते. अमेरिकेत ‘टाइम्स स्क्वेअर बॉल ड्रॉप’ हा प्रसिद्ध सोहळा पाहण्यासाठी लाखो लोक एकत्र येतात. या सगळ्या पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी भाव एकच असतो, नव्या वर्षासाठी आनंदी आणि सकारात्मक सुरुवात.

3/7
भारतामध्ये नवीन वर्ष मोठ्या उत्साहात साजरं केलं जातं. शहरी भागांमध्ये पार्टी, केक, फटाके, मित्रांसोबत सेलिब्रेशन यावर भर असतो. मात्र भारताची खासियत म्हणजे इथे फक्त एकच नवीन वर्ष नाही. महाराष्ट्रात गुढी पाडवा, आंध्र- कर्नाटकमध्ये उगादी, पंजाबमध्ये बैसाखी, बंगालमध्ये पोहेला बोईशाख अशी अनेक पारंपरिक नवीन वर्षे वेगवेगळ्या काळात साजरी होतात. त्यामुळे भारतात ‘नवीन सुरुवात’ ही संकल्पना वर्षभर अनुभवता येते.

4/7
नवीन वर्षाचं महत्त्व केवळ सण-समारंभापुरतं मर्यादित नाही. हा काळ आत्मपरीक्षणाचा असतो. गेल्या वर्षात आपण काय साध्य केलं, कुठे चुका झाल्या, काय सुधारता येईल याचा विचार केला जातो. म्हणूनच अनेक लोक नवीन वर्षाच्या सुरुवातीला संकल्प करतात. काही जण आरोग्यासाठी व्यायाम सुरू करण्याचा संकल्प करतात, काही बचतीवर लक्ष देतात, तर काही नवीन कौशल्य शिकण्याचा निर्णय घेतात. हे संकल्प प्रत्यक्षात उतरवणं कठीण असलं तरी प्रयत्न करण्याची प्रेरणा नवीन वर्ष नक्कीच देतं.

5/7
“नवीन वर्ष, नवीन मी” ही भावना लोकांना नवी उमेद देते. जुने दुःख, अपयश, वाईट आठवणी मागे टाकून पुढे जाण्याची मानसिक तयारी या काळात होते. त्यामुळे नवीन वर्ष हा सकारात्मक बदलांचा एक टर्निंग पॉईंट ठरू शकतो.

6/7
शेवटी नवीन वर्ष म्हणजे चमत्कार घडवणारी जादूची तारीख नाही, तर स्वतःमध्ये बदल घडवण्याची एक संधी आहे. तारीख बदलते, कॅलेंडर बदलतं; पण जीवन बदलायचं असेल तर विचार, सवयी आणि कृती बदलणं आवश्यक असतं. नवीन वर्ष आपल्याला तेच सांगत, नवीन आशा बाळगा, सकारात्मक रहा आणि प्रत्येक दिवस नव्या सुरुवातीसारखा जगा.

7/7
अशा या नवर्षानिमित्ताने तुमच्या व्हॉट्सअप डीपीला, स्टेटसला, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर हे हॅप्पी न्यू इअर फोटो ठेवून नव्या वर्षाचं स्वागत करा आणि सगळ्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छाही द्या.

Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement