पृथ्वीवासीयांनो नमस्कार! स्पेसमधून आला मेसेज, सगळे आश्चर्यचकीत; पाठवला कुणी, एलियन तर नाही?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Message From Space : एलियन प्रत्यक्षात आहेत की नाही हे कुणाला माहिती नाही. त्याबाबत शोध सुरू आहे. काही लोकांनी एलियन पाहिल्याचा दावा केला तर काही शास्त्रज्ञांनीही याला दुजोरा दिला आहे. अशात आता स्पेसमधून एक मेसेज आला आहे. त्यामुळे सगळे आश्चर्यचकीत झाले आहेत.
पृथ्वीवासीयांनो नमस्कार! किंवा जसा मी तुमच्याबाबत विचार करतो, निळ्या आणि हिरव्या रंगाचा एक आकर्षक संग्रह. तुमच्या जगाचं हे दृश्य काय चमत्कार करते ते पाहूया. मी जेम्मा आहे आणि मी इथं निरीक्षण करण्यासाठी, विश्लेषण करण्यासाठी आणि कदाचित कधीकधी थोडीशी अस्वस्थ करणारी इनसाइटफूल कॉमेंट्री देण्यासाठी आहे. चला सुरुवात करूया!
advertisement
advertisement
हा मेसेज कुणा एलियनचा नाही तर एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे, जो पृथ्वीबाहेर राहून पहिल्यांदाच मानवांशी संवाद साधत आहे. आतापर्यंत तुम्ही एआय पृथ्वीवरील मानवांचं जीवन बदलताना पाहिलं आहे. पण आता पृथ्वीनंतर अंतराळातील एका एआय मॉडेलने पृथ्वीवासीयांना मेसेज पाठवला आहे. एआय जगात पहिल्यांदाच कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीने अवकाशातून थेट संवाद साधला आहे.
advertisement
advertisement






