Indian Railway Accident : पुल तुटला, 800 प्रवाशांचा मृत्यू! भारतातील 'या' दुर्दैवी रेल्वे अपघातांबद्दल तुम्हाला माहितीय का?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Indian Railway Accident : गेल्या काही वर्षांत भारतात रेल्वे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या अपघातांमागे देखभाल दुरुस्तीचा अभाव असल्याचे प्रवाशी मोठ्या प्रमाणात जबाबदार धरत आहेत. या सगळ्यात देशातील सर्वात मोठे रेल्वे अपघात कोणते आहेत ते जाणून घेऊया.
advertisement
advertisement
advertisement
गेल्या वर्षी कोरोमंडल एक्सप्रेस ही ट्रेन शालिमार स्थानकावरून चेन्नईला जात होती. प्रथम, हावडा-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस रुळावरून घसरलेल्या हमसफर एक्स्प्रेसच्या दोन बोगींना धडकली. या धडकेनंतर कोरोमंडल एक्सप्रेस त्याच ट्रॅकवर उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. लगेचच कोरोमंडलाचे इंजिन मालगाडीच्या वर चढले. त्या भीषण रेल्वे अपघातात सुमारे 296 लोकांचा मृत्यू झाला होता.
advertisement
त्यानंतर आसाममधील गैसालजवळ 2,500 हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या दोन गाड्यांमध्ये टक्कर झाली. अवध-आसाम एक्स्प्रेस आणि ब्रह्मपुत्रा मेल यांच्यात झालेल्या धडकेत २६८ जणांचा मृत्यू झाला. 359 जखमी झाले. अपघाताची तीव्रता एवढी होती की, अवध-आसाम ट्रेनचे इंजिन दूरवर फेकले गेले. दोन गाड्यांमधील प्रवासीही लोकलपासून दूर फेकले गेले होते.










