अचानक बदलला शेकडो नद्यांच्या रंग, झाल्या नारंगी; जगावर येतेय एक मोठी आपत्ती
- Published by:Priya Lad
Last Updated:
Arctic Orange Rivers : जगभरात बऱ्याच नद्या आहेत. त्यापौका आर्क्टिकमध्ये असेलल्या शेकडो नद्यांचा रंग बदलला आहे, या नद्या नारंगी झाल्या आहेत आणि शास्त्रज्ञांनी एका मोठा आपत्तीचा इशारा दिला आहे.
advertisement
रिपोर्टनुसार आर्क्टिकमध्ये शेकडो नद्या अचानक नारंगी रंगाच्या झाल्या आहेत. शास्त्रज्ञ याचं कारण रासायनिक प्रदूषण नाही तर वितळणारे पर्माफ्रॉस्ट असल्याचं सांगत आहेत. हजारो वर्षांपासून जमिनीत गोठलेलं लोह खनिज आता वाढत्या तापमानामुळे आणि बर्फ वितळल्यामुळे नद्यांमध्ये मिसळत आहेत. यामुळे पाण्याची गुणवत्ता खालावत आहे. 200 हून अधिक नद्यांवर परिणाम होत आहे.
advertisement
advertisement
advertisement
ज्येष्ठ शास्त्रज्ञ मॅथ्यू ड्रकेनमिलर यांच्या मते, आर्क्टिकचं वितळणं ही फक्त एक प्रादेशिक समस्या नाही. संपूर्ण जगाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. किनारी शहरं पाण्याखाली जाण्याचा धोका वाढेल. वन्य प्राण्यांना अन्न शोधण्यात अडचण येईल. अवकाळी पाऊस, पूर आणि भूस्खलनाचं प्रमाण लक्षणीयरीत्या वाढेल. (सर्व फोटो : Noaa Video Grab)









