Rajkot Fort Shivaji Maharaj Statue : जिथं शिवरायांचा पुतळा कोसळला; त्या राजकोट किल्ल्याबाबत तुम्हाला हे माहितीये का?

Last Updated:
छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले उभारले. त्याच किल्ल्यांपैकी एक राजकोट किल्ला. या किल्ल्याबाबत अनेकांना माहिती नाही. या किल्ल्याबाबत ही थोडक्यात माहिती.
1/7
सिंधुदुर्ग येथे राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य पुतळा वादळी वाऱ्याने कोसळल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरून राजकारणही पेटलं आहे.

advertisement
2/7
छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधल्यावर त्याचं रक्षण करण्यासाठी काही किल्ले बांधले. यात पद्मगड, सर्जेकोट आणि राजकोटचा समावेश आहे.

3/7
मालवणच्या किनार्‍यावर उत्तरेकडे खडकाळ आणि उंच भागावर असलेल्या मोकळ्या जागेत राजकोटचा किल्ला बांधण्यात आला. राजकोट किल्ला उंचावर असल्यामुळे उत्तरेकडील समुद्रावर लक्ष ठेवणं सहज शक्य झालं. या किल्ल्यामुळे सिंधुदर्ग किल्ल्याचं जमिनीवरील हल्ल्यापासून संरक्षण झालं.

4/7
छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स 1664 ते 1667 या काळात राजकोट किल्ल्याची उभारणी केली. 1766 साली इंग्रद आणि करवीरकर यांच्यात तह झाला. त्यानुसार राजकोट किल्ल्यात इंग्रजांनी वखार आणि मोठे जहाज उभे करण्यासाठी परवानगी मागितली होती.

5/7
1862 मध्ये किल्ल्यात इमारतींचे अवशेष, तुटलेली तटबंदी आणि एक तोफ असल्याचा उल्लेख आहे. आता मात्र तिन्ही बाजूंनी समुद्राचं पाणी एका बाजूला जमीन असलेल्या किल्ल्यावर बुरुज सोडता कोणतेच अवशेष नाहीत. या बुरुजावर आता धोक्याची सूचना दाखवणारा बावट्याचा स्तंभ आहे.

6/7
राजकोटच्या आसपास असलेल्या खडकाळ भागात रॉक गार्डन बनवण्यात आलं आहे. शिवाजी महाराजांनी उभारलेले जांभ्या दगडातील मौनी महाराजांचं मंदिर मेढा राजकोट भागात आहे. राजकोटहून मालवणला जाताना वाटेत सुवर्ण गणेशाचं मंदिर आहे.

7/7
इथं शिवरायांचा भव्य पुतळा बांधून डिसेंबर 2024 मध्ये  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं होतं. यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. हाच पुतळा आता कोसळला आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement