8 फूट 3 इंचाचा सुलतान! जगातला सर्वात उंच माणूस, पण दररोज करावा लागतोय मोठा संघर्ष!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
तुर्कस्तानमधील 39 वर्षीय सुलतान कोसेन, 8 फूट 3 इंच (251 सेमी) उंचीसह जगातील सर्वात उंच व्यक्ती म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहेत. त्यांच्या मेंदूतील...
तो आपल्या घराच्या अंगणात उभा आहे आणि दुसऱ्या मजल्यावरील घराची खिडकी बंद करण्यासाठी हात वर करतो. त्याचे कपडे इतके मोठे आहेत की, त्यात दोन सामान्य माणसं सहज बसू शकतील. त्याचे हात आणि पाय इतके मोठे आहेत की त्याला खास ऑर्डर देऊन शूज बनवावे लागतात. तो सामान्य गाड्यांमधून प्रवास करू शकत नाही, ट्रेन किंवा बसमध्ये त्याला जागा मिळत नाही आणि तो इतका उंच आहे की सामान्य उंचीच्या दरवाज्यातून घरातही प्रवेश करू शकत नाही. तो आहे सुलतान कोसेन, जगातील सर्वात उंच माणूस.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सुलतानचं आयुष्य अडचणींशिवाय नव्हतं! त्याच्या उंचीमुळे लहानपणी कोणी त्याच्याशी मैत्री करत नव्हतं. तो पलंगावर झोपायचा तेव्हा त्याचे पाय बाहेर लटकत असत. लहानपणापासून त्याला कुठेही सहज प्रवास करता येत नव्हता कारण तो कोणत्याही गाडीत बसू शकत नव्हता. मात्र, सुलतानने हार मानली नाही. त्याने आतापर्यंत जगातील 128 देशांना भेटी दिल्या आहेत.
advertisement
सुलतानला जीवनसाथी शोधताना काही त्रास झाला नाही. त्याच्या उंचीमुळे कोणीही त्याच्याशी लग्न करायला तयार नव्हतं. अखेर ज्या महिलेने सुलतानला आपला पती म्हणून निवडलं, तिला फक्त अरबी भाषा येत होती. तिला तुर्की भाषा समजत नव्हती आणि बोलताही येत नव्हती. 2013 मध्ये सुलतानने त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या मर्वे डिबोसोबत लग्न केलं आणि एका वर्षानंतर तिने उंचीचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला.