फक्त प्रवास करण्यासाठी नाही रेल्वे तिकीट इथंही येतं कामी; 99% लोकांना माहितीच नाही
- Published by:Priya Lad
Last Updated:
रेल्वेनं प्रवास करायचा म्हणून आपण रेल्वेचं तिकीट काढतो. पण हे तिकीट फक्त प्रवास करण्यासाठी नाही तर अनेक ठिकाणी कामी येतं. म्हणजे रेल्वे तिकीट खरेदी केल्यानंतर प्रवाशांना अनेक अधिकार मिळतात, त्यांना अनेक सुविधा मोफत मिळतात.
रेल्वेच्या एसी1, एसी2, एसी3 च्या सर्व कोचमध्ये दोन बेडशीट, एक पांघरूण आणि एक उशी, एक छोटं टॉवेल मिळते. गरीब रथ एक्स्प्रेसमध्ये यासाठी अतिरिक्त 25 रुपये द्यावे लागतात. काही ट्रेनच्या स्लीपर कोचमध्ये बेडरोलही मिळतात. तुम्हाला ट्रेन प्रवासादरम्यान बेडरोल मिळाले नाही तर तुम्ही याबाबत तक्रार करून रिफंडचा दावा करू शकता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement