असे पुरुष खरंच खूप कमी असतात! ही Love Story वाचून तुमच्या डोळ्यात पाणी येईल
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Valentine's Special: प्रेम हे चेहऱ्यापलिकडचं असतं असं म्हणतात तेच खरंय. ही लव्हस्टोरी वाचून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. नराधमाने तिचा चेहरा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु तिच्या जोडीदाराने मात्र केवळ तिच्या जखमांवर फुंकर मारली नाही, तर चेहऱ्यासह तिचं आयुष्यही सुंदर बनवलं.
उत्तर प्रदेशच्या रामबागेत राहणाऱ्या या तरुणीवर तिच्याच परिसरात राहणारा 35 वर्षीय प्रदीप खूप प्रेम करायचा. त्याचं हे प्रेम नव्हतं, तर विकृती होती. तो तिला येता-जाता त्रास द्यायचा. तरुणीने याबाबत तिच्या आईला सांगितलं असता आईने त्याला त्याच्या घरी जाऊन खडसावलं. त्यावर प्रदीप प्रचंड संतापला. त्याच्या विकृतीने टोक गाठलं. तो थेट तिच्या घरी गेला. त्यावेळी तरुणी आपल्या भावंडांसोबत कॅरम खेळत होती. कोणाला काही कळायच्या आत प्रदीपने तिच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकलं. त्यात तरुणीला गंभीर जखमा झाल्या. तिचं आयुष्यात होत्याचं नव्हतं झालं.
advertisement
...परंतु रात्रीनंतर दिवस उजाडतो तेच खरं. बोदलाचा रहिवासी असलेल्या आलोकने कोरोना काळात या तरुणीचा फोटो फेसबुकवर पाहिला. त्याला ती खूप आवडली. त्याने मेसेजवरून तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तिने मात्र काहीच रिप्लाय दिला नाही. तरीही त्याचे प्रयत्न सुरूच होते. शेवटी तिनेसुद्धा त्याला एकदा रिप्लाय दिलाच. आलोक हा एका शू फॅक्टरीमध्ये काम करत होता. कालांतराने दोघांमध्ये मैत्री झाली, हळूहळू दोघं भेटू लागले. एकमेकांना व्यवस्थित ओळखल्यानंतर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
कुटुंबीय मात्र या लग्नाच्या विरोधात होते. परंतु अखेर 15 एप्रिल 2022 रोजी एका मंदिरात दोघांचा विवाहसोहळा पार पडला. आता त्यांचा सुखाचा संसार सुरू आहे. आलोकच्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं होतं. मुलगा सहा महिन्यांचा असताना तिचं निधन झालं. त्यानंतर आलोक आणि त्याची पत्नी आई-वडिलांप्रमाणे या मुलाचा सांभाळ करतात.
advertisement
advertisement
महत्त्वाचं म्हणजे जानेवारी महिन्यात तरुणीवर शस्त्रक्रिया होणार होती परंतु त्यापूर्वी तिला पॅनिक अटॅक आला. तेव्हा आलोकने तिला परत बोलवून घेतलं. तो म्हणाला, 'मला तू जशी आहेस तशीच आवडतेस. माझं तुझ्या मनावर प्रेम आहे.' याच दरम्यान तरुणीच्या गुन्हेगारालाही शिक्षा झाली. प्रदीपला न्यायालयाने आजन्म कारावास ठोठावला.


