Assembly Election: विधानसभा निवडणुकीसाठी भाजप मैदानात, उद्या मुंबईत रोडमॅप ठरणार!

Last Updated:

विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष तयारीला लागला. उद्या मुंबईत भाजपाच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडतीय...यामध्ये निवडणुकीचा रोडमॅप ठरवला जाणार आहे...

News18
News18
मुंबई:
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजप मैदानात उतरला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रचाराचं उद्या रणशिंग फुंकलं जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राज्यभरातील सर्व भाजप नेते - पदाधिकारी - कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. विरोधकांकडून राबवल्या जाणाऱ्या प्रचाराला तोंड देण्यासाठी भाजप आता रणनिती आखत आहे.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे प्रस्ताव मांडणार आहे. या सोबतच राज्य सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पावर देखील चर्चा होणार आहे. भाजपच्या उद्याच्या मेळाव्यात माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, सह संघटन मंत्री शिवप्रकाश, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भाषणे होणार आहेत.
view comments
मराठी बातम्या/Politics/
Assembly Election: विधानसभा निवडणुकीसाठी भाजप मैदानात, उद्या मुंबईत रोडमॅप ठरणार!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement