Manoj Jarnge: मनोज जरांगे भान हरपले, भर सभेत नको ते बोलले, VIDEO व्हायरल

Last Updated:

मनोज जरांगे आता मराठा आरक्षणावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी भरसभेत सरकार आणि छगन भुजबळांना धारेवर धरलं आहे. टीका करताना जरांगेंची जीभ देखील घसरली...

News18
News18
छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगेंनी  सरकारला सगेसोयरेच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी एका महिन्याची मुदत दिली होती. ती मुदत आज म्हणजेच 13 जुलैला संपत आहे. अशा परिस्थितीत सरकारने अद्यापही कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. अलीकडेच जरांगेंनी शांतता जनजागृती रॅलीचे आयोजन केले. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली आता छत्रपती संभाजीनगर अशी ही रॅली पार पडली. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मनोज जरांगेंनी मराठा समाज बांधवांना संबोधित केलं.
जरांगेंची भाषा घसरली:
यावेळी भाषणात बोलताना मनोज जरांगे राज्य सरकार आणि ओबीसी नेते छगन भुजबळांवर तुटून पडले. "छगन भुजबळ मला चौथी शिकलेला, गावठी म्हणाले होते. आता भुजबळांनी समोर यावं मी त्यांना कचका दाखवतो "असं जरांगे म्हणाले. यावेळी बोलताना जरांगेंनी छगन भुजबळांचा पुन्हा एकदा एकेरी भाषात उल्लेख केला. "वेळ आली तर 15 दिवसांच्या आत ओबीसी समाजाचं 27 टक्के आरक्षण रद्द करून दाखवेन, पण मला ओबीसी समाजाचं वाटोळ करायचं नाही, म्हणून मी शांत आहे, असं जरांगे म्हणाले."
advertisement
जरांगे काय म्हणाले? "मला मंत्री पद दिले तरी लाथेने उडवून टाकीन, ट्रॅक भरून पैसा आणला तरी विहिरीत ओतून टाकीन. आगामी काळात सरकार मला बदनाम करेल किंवा माझा घातपात करेल." असा गंभीर आरोप देखील जरांगे पाटलांनी केला. यावेळी भुजबळांचे दात पाडेन, असं देखील जरांगे म्हणाले.
राज्य सरकारला इशारा: यावेळी जरांगेंनी राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे. "सरकारने आम्हाला फसवलं, ही भावना आमच्यामध्ये आता वाढीस लागली आहे. त्यामुळे सरकारने सावध रहावं...सरकारने मराठा आरक्षणाबाबत तात्काळ ठोस निर्णय न घेतल्यास आगामी निवडणुकीत त्यांचे सर्वच्या सर्व 288 उमेदवार मराठे पाडतील." असा गंभीर इशारा मनोज जरांगेंनी राज्यसरकारला दिला आहे. दुसरीकडे सगे सोयरेंच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मनोज जरांगेंनी सरकारला दिलेली मुदत देखील आता संपली आहे. त्यामुळे येत्या 20 तारखेला मराठा समाजाची महत्वपूर्ण बैठक अंतरवाली सराटीमध्ये पार पडणार आहे. त्यामध्ये मराठा समाजाच्या आंदोलनाची पुढील भूमिका ठरवणार असल्याचं जरांगेंनी जाहीर केलं.
advertisement
'मराठा समाज पुन्हा मुंबईत धडकू शकतो, याची सरकारने जाणीव ठेवावी. येत्या 20 तारखेला  आम्ही त्याबाबत भूमिका ठरवणार आहोत, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.' एकंदरीत मराठा आंदोलन रौद्ररूप धारण करेल, असं जरांगेंनी म्हटलं आहे, सरकारच्या वतीने शंभूराज देसाईंनी समाजाने आणि जरांगेंनी संयमी भूमिका घ्यावी असं म्हटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/Politics/
Manoj Jarnge: मनोज जरांगे भान हरपले, भर सभेत नको ते बोलले, VIDEO व्हायरल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement