Ramdas Athawale : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीत वादाचे फटाके! रामदास आठवलेंनी दिला मित्रपक्षांना इशारा
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Ramdas Athawale : विधानसभा निवडणुकीआधी आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी महायुतीला इशारा दिला आहे.
रत्नागिरी, (चंद्रकांत बनकर, प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा कोकण प्रदेशचा मेळावा पार पडला. आरपी आयचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत भव्य सत्कार संपन्न झाला. यावेळी रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीमध्ये कार्यकर्त्यांना मार्ददर्शन केलं. आम्ही देखील महायुतीमध्ये आहोत. मात्र, आमचं नाव कुठेही घेतलं जात नाही. तीन पक्ष आल्यानंतर आम्हाला विसरले, पण पक्षात लहान जरी असला तरी वर्गणी पॉवर आमच्या पक्षाची चालते. आम्ही ज्या पक्षासोबत असतो त्यांची सत्ता येते आणि आम्ही ज्यांच्या सोबतनसतो त्यांची सत्ता येत नाही, असं म्हणत महायुतीतील घटक पक्षांना इशारा दिला आहे.
काय म्हणाले रामदास आठवले?
पूर्वी भाजप आणि शिवसेनेला युती म्हणायचे. आता तीन पक्ष एकत्र आल्यामुळे आमचं कुठेही नाव येत नाही. शासन आपल्या दारी आणि आम्ही आमच्या घरी अशी मिश्कील टिपण्णी आठवले यांनी केली. रिपब्लिकन पार्टी आल्यानंतर महायुती झाली आहे. ते शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपने लक्षात घ्यायला हवी. आमचा पक्ष छोटा असला तरी कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाला पाडायचं हे आम्ही ठरवतो. ज्यांच्या सोबत मी जातो त्यांना सत्ता मिळते. गेल्या तीन दशकाचा महाराष्ट्राच्या राजकारणात हा अनुभव आहे. गट किती असू द्या. पण रामदास आठवले हा पठ्ठ्या दिल्लीत असणारा एकमेव आहे.
advertisement
वाचा - 'शरद पवारांनी जातीचं विष कालवलं'; नागपुरातून राज ठाकरेंचा हल्लाबोल
बाबासाहेबांनी सांगितले आहे. सत्तेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. आणि मी ज्यांच्या सोबत जातो त्यांना सत्ता मिळते. त्यांना सत्ता मिळाली, मला मिळते, मला नाही मिळाली तर त्यांनाही मिळत नाही. त्यामुळे सत्तेसाठी असणारी बार्गेनिंग पॉवर आमच्या पक्षात आहे, असा इशारा रामदास आठवले यांनी दिला.
Location :
Ratnagiri,Maharashtra
First Published :
August 24, 2024 4:13 PM IST
मराठी बातम्या/Politics/
Ramdas Athawale : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीत वादाचे फटाके! रामदास आठवलेंनी दिला मित्रपक्षांना इशारा