'शरद पवारांनी जातीचं विष कालवलं'; नागपुरातून राज ठाकरेंचा हल्लाबोल
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला, ते नागपुरात बोलत होते.
नागपूर, उदय तिमांडे, प्रतिनिधी : मनसेप्रमुख राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया देताना जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. 'पुरोगामी महाराष्ट्राचा उलट प्रवास सुरू झाला आहे, जातीयवादाला कारणीभूत शरद पवार हे आहेत. याची सुरुवात शरद पवारांनी केली. पुलद स्थापन झाल्यापासून सुरुवात झाली. पवारांनी अनेक लोकं फोडले. जातीचं विष शरद पवारांनी कालवलं' असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
'पुरोगामी महाराष्ट्राचा उलट प्रवास सुरू झाला आहे, जातीयवादाला कारणीभूत शरद पवार हे आहे. याची सुरुवात शरद पवारांनी केली. पुलद स्थापन झाल्यापासून सुरुवात झाली. पवारांनी अनेक लोकं फोडले. जातीचं विष शरद पवारांनी कालवलं, शरद पवार सत्तेत यायच्या आधीचा महाराष्ट्र बघा, आज संत जातीमध्ये वाटल्या गेले आहेत. प्रत्येकाला राजकारण करायचं असल्याने जे चालत ते नान चालवून घ्या अशी भाजपची पद्धत आहे. पक्ष फोडणे आमदार फोडणे सगळ्यांनी बंद केलं पाहिजे,' असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
advertisement
दरम्यान विधानसभा निवडणुकीवर देखील राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी निवडणूक लढवणार, सगळ्या मतदारसंघात उमेदवार उभे करणार. 52 वर्षांपासून भाजप सत्ता मागत होती, 2014 मध्ये त्यांना सत्ता मिळाली, मला देखील लोक सत्ता देतील त्याला वेळ लागेल असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Location :
Nagpur,Nagpur,Maharashtra
First Published :
August 24, 2024 12:48 PM IST