लेकाचा मृतदेह खांद्यावरच आणि वडिलांनाही मृत्यूने गाठलं, अंत्यसंस्काराआधी भयानक घडलं

Last Updated:

Father died after son death : डेव्हिडचा मृतदेह कॉफिनमध्ये ठेवून चर्चमध्ये नेला जात होता. तेव्हा नॉर्मन खाली कोसळला. यानंतर आपत्कालीन सेवेला बोलावण्यात आलं. पण नॉर्मनला वाचवता आलं नाही.

प्रतीकात्मक फोटो (AI generated image)
प्रतीकात्मक फोटो (AI generated image)
लंडन : आपण हयात असातना आपल्या पोटच्या गोळाचा मृत्यू कोणत्याच आईवडिलांना सहन होणारा नाही. मुलांच्या मृत्यूचं दुःख पचवणं तितकं सोपं नाही. मुलाला खांदा देणं किंवा त्याच्यावर अंत्यसंस्कार करणं हे प्रत्येक बापासाठी कठीणच. काळजावर दगड ठेवून तो आपल्या लेकाला निरोप देत असतो. असाच एक बाप ज्याने आपल्या मुलाला गमावलं. त्याचा मृतदेह त्याच्या खांद्यावर होता आणि त्यालाही मृत्यूने गाठलं.
बापलेकाच्या मृत्यूची ही धक्कादायक घटना. इंग्लंडमधील हे प्रकरण. 61 वर्षांचा नॉर्मन व्हाइट ज्याचा मुलगा डेव्हिडचा वयाच्या 41 व्या वर्षी मृत्यू झाला. डेव्हिड बऱ्याच काळापासून ड्रग्जच्या व्यसनाशी झुंजत होता. डेव्हिडने त्याचं व्यसन सोडण्याचा प्रयत्न केला होता. कुटुंबाच्या मते, त्याने बरे होण्याच्या दिशेने बरीच प्रगती केली होती. पण एके दिवशी डेव्हिड त्याच्या एका नातेवाईकाच्या सोफ्यावर मृतावस्थेत आढळला. यानंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला.
advertisement
मिरर यूकेच्या वृत्तानुसार डेव्हिडचा मृतदेह कॉफिनमध्ये ठेवून चर्चमध्ये नेला जात होता. तेव्हा नॉर्मन खाली कोसळला. यानंतर आपत्कालीन सेवेला बोलावण्यात आलं. पण नॉर्मनला वाचवता आलं नाही. त्याला हार्ट अटॅक आला. नॉर्मनलाही मृत्यूने गाठलं. मुलावर अंत्यसंस्कार करण्याआधीच बापानेही जीव सोडला.
advertisement
वडिलांवर अंत्यसंस्कारानंतर मुलाचा मृत्यू
काही दिवसांपूर्वीच राजस्थानात घडलेली ही घटना.  कोटा शहरातील हरिओम नगर कच्ची बस्ती येथील 50 वर्षीय पुरीलाल बैरवा हा मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. काही दिवसांपासून तो लकव्याच्या त्रासाने पीडित होता. त्याने अखेरचा श्वास घेतला. कुटुंबाने त्याच्यावर अंत्यसंस्कार केले तोच त्याच्या मृत्यूनंतर काही तासांतच कुटुंबाला अजून मोठा आघात बसला.
advertisement
पुरीलालचा 25 वर्षीय मुलगा राजू बैरवा हा वडिलांच्या मृत्यूच्या धक्क्याने कोसळला. वडिलांची चिता थंड होण्याआधीच दोन तासांत त्याला हार्ट अटॅक आला आणि त्याचाही मृत्यू झाला. काही तासांच्या आत वडील आणि मुलगा दोघांना गमावल्याने घरच्यांचा विश्वासच बसेना. मोहल्ल्यातील लोकांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आणि वातावरण शोकमग्न झाले.
advertisement
हा गरीब मजूर कुटुंब आर्थिकदृष्ट्या इतका कमकुवत होता की दोघांच्या अंत्य संस्कारासाठीही खर्च भागवणं शक्य झालं नाही. अशा वेळी परिसरातील लोक आणि ओळखीचे पुढे आले आणि चंदा जमवून अंतिम विधी पार पाडण्यात आला. आता या घरात फक्त आई, गुड्डी आणि 13 वर्षांचा धाकटा मुलगा अरविंद उरले आहेत. एकाच दिवशी पती आणि मुलगा गमावलेल्या आईचा आक्रोश थांबत नाही आणि अरविंद अजूनही या मोठ्या अपघातातून सावरू शकलेला नाही.
view comments
मराठी बातम्या/Viral/
लेकाचा मृतदेह खांद्यावरच आणि वडिलांनाही मृत्यूने गाठलं, अंत्यसंस्काराआधी भयानक घडलं
Next Article
advertisement
Eknath Shinde Sharad Pawar : शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', पाहा Video
शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'',
  • शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', Vi

  • शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', Vi

  • शरद पवारांना वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा, ''तुम्ही...'', Vi

View All
advertisement