पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! केंद्रीय अर्थसंकल्पात मेट्रोसाठी मिळाला तब्बल 814 कोटींचा निधी
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
पुणे मेट्रो प्रशासन या निधीचा कसा आणि कोणत्या कामासाठी उपयोग करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर लोकल18 च्या टीमने पुणे मेट्रोचे अधिकारी हेमंत सोनावणे यांच्यासोबत संवाद साधला.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल मंगळवारी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला विविध कामांसाठी निधी मिळालेला आहे. पुणेकरांसाठी देखील केंद्र सरकारने पुणे मेट्रोच्या कामासाठी जवळपास 814 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. यामुळे आता पुण्याच्या विकासाला आणखी वेगाने चालना देण्यासाठी हा निधी उपयुक्त ठरणारा आहे.
पुणे मेट्रो प्रशासन या निधीचा कसा आणि कोणत्या कामासाठी उपयोग करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर लोकल18 च्या टीमने पुणे मेट्रोचे अधिकारी हेमंत सोनावणे यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, हा निधी फेज 1 चे उर्वरित काम, सिव्हिल कोर्ट अंडर ग्राउंड ते स्वारगेट स्टेशन आणि उर्वरित कामासाठी केला जाणार आहे. त्यामुळे 33 किलोमीटरचा फेज 1 हा पूर्ण होणार आहे.
advertisement
तसेच उरलेला निधी हा पीसीएमसी ते निगडीचे राहिलेल्या कामासाठी वापरला जाणार आहे. तर जे स्टेशन आहे ते सर्व सुविधानी उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे इतर स्टेशनही बांधले जाणार आहेत.
advertisement
33 किलोमीटरचा जो मेट्रो मार्ग आहे, त्यामधील 29.5 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे आणि राहिलेला साडेतीन किलोमीटरचा मार्ग हा 15 सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल. आता सध्या जर पाहिले तर 1 लाखापेक्षा जास्त लोक हे रोज मेट्रोने प्रवास करत आहेत. त्यामुळे या निधीचा निश्चित फायदा होऊन उर्वरित कामेही लवकर होण्यासाठी या निधीचा फायदा होणार आहे, अशी माहिती पुणे मेट्रोचे अधिकारी हेमंत सोनावणे यांनी दिली.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
July 24, 2024 8:29 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! केंद्रीय अर्थसंकल्पात मेट्रोसाठी मिळाला तब्बल 814 कोटींचा निधी