पुण्यात सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या, असे आहेत आताचे नवीन दर...
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केला. त्यानंतर, सर्वांनाच उत्सुकता असलेल्या मौल्यवान वस्तुंच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे.
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे : सोने खरेदी हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मात्र, सोन्याच्या दराने मधल्या काळात उच्चांक गाठल्याने अनेक सोने प्रेमींनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली होती. मात्र, आता सोने प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे.
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केला. त्यानंतर, सर्वांनाच उत्सुकता असलेल्या मौल्यवान वस्तुंच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी लोकल18 च्या टीमने पुण्यातील आर. सी. राका ज्वेलर्सचे व्यापारी ऋषभ राका यांच्याशी संवाद साधला.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, पुणे शहरासह राज्यातील सर्वच शहरात सोन्याच्या दरात मोठी कपात झाली आहे. पुण्यात 5 हजार रुपयांनी प्रतितोळा सोने दरात घट झाले आहे. यामुळे ग्राहकांमध्ये आनंद पाहायला पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचा दरात मोठी वाढ होत असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे, ग्राहकांनी सोनं खरेदीकडे पाठ फिरवली होती.
advertisement
नेमका बदल काय?
सोने, चांदीवरील सीमा शुल्क - 6 टक्के
प्लॅटिनमवरील सीमा शुल्क- 6.4 टक्के
अमोनिअम नायट्रेटवरील सीमा शुल्क 7 टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आला आहे.
आता सोन्याची स्टॅम्प ड्युटी कमी करण्यात आली आहे. तसेच, जीएसटी व सेल्स टॅक्स मिळून कमीत कमी 6 टक्क्यांपर्यंत स्टॅम्प ड्युटी कमी झाली आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे सोन्याच्या दरात घट झाल्याने पुन्हा सोन्याच्या दुकाना ग्राहकांची गर्दी दिसून येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
advertisement
पुण्यात काय होती परिस्थिती -
advertisement
पुण्यात 2 दिवसांपूर्वी सोन्याचे दर हे 74 हजार रुपये प्रतितोळा होते. तर आज 69,000 प्रतितोळा इतके आहेत. आहे. जितक्या झपाट्यानं सोन्याचा दर वाढला होता इतक्याच तेजीने दर घसरला असल्याची माहिती ऋषभ राका यांनी दिली. लगीन सराई सुरू होणार असल्याने आता सोनं खरेदी करुन ग्राहकांनी सुवर्ण संधीचा लाभ घेतला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
July 24, 2024 3:15 PM IST