मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना प्रवीण तरडेंचा मदतीचा हात, पुण्यात 200 विद्यार्थ्यांची भरली फी!
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Niranjan Sherkar
Last Updated:
अभिनेते प्रवीण तरडे यांनी पूरग्रस्त भागातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली आहे.
मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. अनेक कुटुंबांचे संसार वाहून गेले, घरं उध्वस्त झाली आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे मोठ आर्थिक संकट उभ राहिलं. आर्थिक संकटाला तोंड देणाऱ्या मराठवाड्यातील पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तब्बल 200 विद्यार्थ्यांना अभिनेते प्रवीण तरडे यांनी मदतीचा हात दिला आहे. याबाबतची अधिक माहिती लोकल 18 शी बोलताना प्रवीण तरडे यांनी दिली.
मराठवाड्यात झालेल्या पूरपरिस्थितीमुळे पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. या विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, त्यांना अडचणी येऊ नयेत आणि त्यांचे शिक्षण थांबू नये, या भावनेतून अभिनेते प्रवीण तरडे यांनी हा उपक्रम राबवला. प्रवीण तरडे यांनी सांगितले की,"मराठवाड्यात झालेल्या पूरपरिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला. मात्र पुण्यात शिक्षण घेणाऱ्या आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर आहोत, इथून पुढे सुद्धा आम्ही ह्या उपक्रमाच्या मार्फत विद्यार्थ्यांना मदत करणार आहोत.
advertisement
विद्यार्थ्यांनी खचून न जाता अभ्यास चालू ठेवून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी. या उपक्रमांतर्गत प्रवीण तरडे यांनी विद्यार्थ्यांना पुण्यात राहण्यासाठी लागणारे रूम भाडे, मेसचा खर्च, अभ्यासिकेची लागणारे फीज इत्यादी गोष्टींसाठी आर्थिक मदत केली आहे. अभिनेते प्रवीण तरडे यांनी यापूर्वी सुद्धा विविध सामाजिक प्रमाण मध्ये सहभाग घेत शेतकऱ्यांना मदत आणि विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. मात्र स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात आलेल्या या उपक्रमाबाबत विद्यार्थ्यांनी अभिनेते प्रवीण तरडे यांचे आभार मानले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
November 08, 2025 4:54 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना प्रवीण तरडेंचा मदतीचा हात, पुण्यात 200 विद्यार्थ्यांची भरली फी!

