Pune: MPSC च्या कारभारावर एमपीएसीचे विद्यार्थी भडकले, विद्यार्थ्यांनी पुण्यात पुकारलं आंदोलन
- Published by:Sachin S
Last Updated:
या पदाची वयोमर्यादा एका वर्षाने वाढवण्याची मागणी राज्यभरातून स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी करत आहेत.
अभिजीत पोते, प्रतिनिधी
पुणे: राज्यात एकीकडे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. पोलीस उपनिरीक्षक भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्यानं आणि वयोमर्यादा वाढीसाठी पुण्यात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे.
पुण्यात एमपीएसीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे अलीकडेच पोलीस उपनिरीक्षक पदाची जाहिरात काढण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा ही 4 जानेवारी 2026 ठेवण्यात आली आहे. आधीच उशिरा काढण्यात आली आहे, त्यामुळे वयोमर्यादाचं प्रश्न उपस्थितीत झाला आहे. या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. त्यानंतर आता पुण्यातील शास्त्री रोडवर स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचा आंदोलन सुरू झालं आहे.
advertisement
पोलिस उपनिरीक्षक पदाच्या भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाली आहे. या पदाची वयोमर्यादा एका वर्षाने वाढवण्याची मागणी राज्यभरातून स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी करत आहेत. यासंदर्भात वेळोवेळी निवेदन देऊनही सरकार दखल घेत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. पुण्यातील शास्त्री रोडवरती स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आाहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 01, 2026 10:39 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune: MPSC च्या कारभारावर एमपीएसीचे विद्यार्थी भडकले, विद्यार्थ्यांनी पुण्यात पुकारलं आंदोलन










