अजितदादा विमान अपघात प्रकरणी महत्त्वाची अपडेट, जय पवारांच्या 'त्या' व्हिडीओचा इम्पॅक्ट, VSR कंपनीच्या मालकाची आता...
- Published by:Sachin S
Last Updated:
अजित पवार विमान अपघात प्रकरणी सीआयडीकडून तपास सुरू आहे. व्ही. के. सिंग पाठोपाठ रोहित सिंगची पण चौकशी होणार आहे.
अभिजीत पोते, प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी एकीकडे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले आहे. तर दुसरीकडे या प्रकरणी सीआयडीकडून चौकशी सुरू आहे. मागील काही दिवसांपासून VSR कंपनीचे मालक व्ही.के. सिंग यांची चौकशी सुरू आहे. आता त्यांचा मुलगा रोहित सिंग याची देखिल चौकशी होणार, असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, जय पवार यांनीच रोहित सिंगचा एक व्हिडीओ अलीकडेच शेअर केलाा होता.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार विमान अपघात प्रकरणी सीआयडीकडून पुण्यात तपास सुरू आहे. व्ही. के. सिंग पाठोपाठ रोहित सिंगची पण चौकशी होणार आहे. व्हीएसआर कंपनीच्या मालकाची सीआयडीकडून दोन दिवस चौकशी सुरू आहे. सीआयडीकडून व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांची आज सुद्धा चौकशी पार पडली. आता व्ही. के. सिंग यांच्या मुलाची देखिल पुढील काळात चौकशी होणार आहे. बाप-लेकाची एकत्रित चौकशी होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
जय पवार यांनीच याच रोहित सिंगचा व्हिडीओ आणला होता समोर
विशेष म्हणजे, अजित पवार यांचे चिरंजित जय पवार यांनी मागील आठवड्यात सोशल मीडियावर रोहित सिंगचा एक व्हिडीओ शेअर केला होता. याा व्हिडीओमध्ये एक पायलट सीटवर बसून चक्क झोपी गेला होता. विमान हवेत उडत असताना तो झोपलेला होता. पायलट सीटवर झोपलेली व्यक्ती ही रोहित सिंग असल्याचं समोर आलं होतं. VSR कंपनीच्या विमान कंपनीचे रोहित सिंग हे मालक आहे.
advertisement
advertisement
हा व्हिडिओ शेअर करत जय पवारांनी रोहित सिंगच्या अटकेची मागणी केली होती. माझ्या वडिलांना आपण गमावलं. ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे. या व्हिडिओमध्ये VSR चे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत. आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही. हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे. मी DGCA ला ठामपणे मागणी करतो. या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई व्हावी, संपूर्ण चौकशी होईपर्यंत VSR ची सर्व विमानं तात्काळ ग्राऊंड करण्यात यावीत आणि रोहिल सिंह यांना त्वरित अटक करुन कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. ही एका मुलाची आर्त हाक आहे. माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी, असं म्हणत जय पवार यांनी आवाहन केलं होतं. तसंच. पत्रकार परिषद घेण्याचीही घोषणा केली होती, पण काही कारणामुळे पत्रकार परिषद पुढे ढकलली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 09, 2026 10:29 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
अजितदादा विमान अपघात प्रकरणी महत्त्वाची अपडेट, जय पवारांच्या 'त्या' व्हिडीओचा इम्पॅक्ट, VSR कंपनीच्या मालकाची आता...








