अनेक दिवसांपासून तीव्र पोटदुखी; सोनोग्राफी करताच महिलेच्या पोटात दिसलं असं की डॉक्टरही चक्रावले

Last Updated:

संबंधित ज्येष्ठ महिला गेल्या अनेक दिवसांपासून असह्य पोटदुखी, लघवीला त्रास होणे आणि पोटातील जडपणामुळे त्रस्त होत्या. त्यांना साध्या हालचाली करणेही कठीण झाले होते.

महिलेच्या पोटात मोठी गाठ (प्रतिकात्मक फोटो)
महिलेच्या पोटात मोठी गाठ (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : बारामतीमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील एक यशस्वी आणि अत्यंत दुर्मिळ शस्त्रक्रिया पार पडली आहे. येथील डॉक्टरांनी एका ५० वर्षीय महिलेच्या पोटातून तब्बल ४.२ किलो वजनाची मांसल गाठ यशस्वीरित्या बाहेर काढून तिला जीवदान दिले आहे. या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेमुळे महिलेचा अनेक दिवसांचा त्रास दूर झाला असून तिची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.
संबंधित ज्येष्ठ महिला गेल्या अनेक दिवसांपासून असह्य पोटदुखी, लघवीला त्रास होणे आणि पोटातील जडपणामुळे त्रस्त होत्या. त्यांना साध्या हालचाली करणेही कठीण झाले होते. स्थानिक पातळीवर सोनोग्राफी केल्यानंतर त्यांच्या गर्भाशयाच्या पिशवीला मोठी गाठ असल्याचे निदान झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांना बारामती येथील मेहता हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
डॉ. विशाल मेहता यांनी केलेल्या सखोल तपासणीत ही गाठ अत्यंत क्लिष्ट असल्याचे दिसून आले. ही मांसल गाठ शरीरातील अत्यंत महत्त्वाच्या अवयवांना, जसे की मूत्राशय, आतडे आणि लघवीच्या नळीला घट्ट चिकटलेली होती. थोडीशी चूकही रुग्णाच्या जीवावर बेतू शकली असती. अशा जोखमीच्या परिस्थितीत डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.
advertisement
डॉ. विशाल मेहता यांच्या नेतृत्वाखाली डॉ. निकिता मेहता आणि डॉ. पुष्पदंत रुगे या पथकाने तब्बल चार तास ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. अत्यंत सावधगिरीने ही ४.२ किलोची गाठ शरीराच्या इतर भागांना इजा न पोहोचवता बाहेर काढण्यात आली. बारामतीच्या डॉक्टरांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे आणि अचूक निदानामुळे एका मोठ्या संकटातून या महिलेची सुखरूप सुटका झाली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
अनेक दिवसांपासून तीव्र पोटदुखी; सोनोग्राफी करताच महिलेच्या पोटात दिसलं असं की डॉक्टरही चक्रावले
Next Article
advertisement
Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement