Shri Ram Jayanti : भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी श्रीराम जयंतीचा कार्यक्रम केला बंद, नेमकं काय घडलं?

Last Updated:

Shri Ram Jayanti : पुण्यात श्रीराम नवमीनिमित्त आयोजित केलेला कार्यक्रम भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी बंद केल्याने खळबळ उडाली आहे.

मेधा कुलकर्णींनी श्रीराम जयंतीचा कार्यक्रम केला बंद
मेधा कुलकर्णींनी श्रीराम जयंतीचा कार्यक्रम केला बंद
पुणे, (चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी) : रामनवमीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये अशाच प्रकारे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, या कार्यक्रमाला गालबोट लागल्याचा प्रकार घडला आहे. पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये खासदार मेधा कुलकर्णी यांनी श्रीराम जयंती निमित्त आयोजित केलेला कार्यक्रम बंद केला. सीयाराम प्रतिष्ठानने या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं.
कोथरूड पोलिसांची परवानगी असताना देखील खासदार मेधा कुलकर्णी यांनी तक्रार करत कार्यक्रम बंद केला. कार्यकर्त्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप युवकांनी केला आहे. भाजप खासदारानेच श्रीराम जयंती निमित्त कार्यक्रम बंद पाडल्याने श्रीराम भक्त नाराज असल्याची चर्चा आहे. याचे व्हिडीओ आता सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. पोलिसांकडून लाठीचार झाल्याने कार्यकर्तेही संतापले होते. तर व्हिडिओ काढणाऱ्या युवकालाही अरेरावीची भाषा करण्यात आली. व्हिडीओ काढणाऱ्या अनेकांचे मोबाईल महिला खासदारांनी ताब्यात घेतल्याचे युवकांनी म्हटले आहे.
advertisement
तर दुसरीकडे लाठीचार्ज केला नसल्याचा खुलासा पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी केला आहे. अद्यापतरी कोणाविरूद्धही एफआयआर दाखल नाही. खासदार महोदयांनी पोलीसांच्या कामात हस्तक्षेप केल्याचाही आरोप कार्यकर्ते करत आहेत. रामनवमीच्या मिरवणुकीत सिनेमाची गाणी लावल्याने खासदार मेधा कुलकर्णी भडकल्याने कार्यक्रम बंद पाडल्याचे बोलले जात आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Shri Ram Jayanti : भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी श्रीराम जयंतीचा कार्यक्रम केला बंद, नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
Shiv Sena Candidate List BMC Election: बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
  • भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ

  • शिंदे यांनी आपल्या ६० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

View All
advertisement