पुण्यातील शनिवारवाडा नमाज पठण प्रकरणी मोठी कारवाई, पोलिसांकडून गुन्हा दाखल
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
शनिवारवाडा परिसरात काही महिलांकडून सामूहिक प्रार्थना करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर अखेर पोलिसांनी कारवाई केली आहे.
अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे : शनिवारवाडा परिसरात काही महिलांकडून सामूहिक प्रार्थना करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर अखेर पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे रविवार शहरातील काही हिंदू संघटनांनी आक्रमक भूमिका घेत शनिवारवाड्याच्या आवारात निदर्शने केली. शनिवारवाडा ही भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) विभागाची संरक्षित वास्तू आहे. अशा ऐतिहासिक ठिकाणी कोणताही धार्मिक विधी किंवा प्रार्थना करण्यास कायद्याने मनाई आहे. त्यामुळे या प्रकाराची कसून चौकशी करून संबंधितांविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती.
advertisement
हा व्हिडिओ मागील एक-दोन दिवसांतील असल्याचे सांगण्यात येत आहे. शनिवारवाड्याच्या आवारात महिलांनी सामूहिक प्रार्थना केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, धार्मिक भावना दुखावल्याचा आणि पुरातत्त्व विभागाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत अनेक संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला.
शनिवार वाड्यात नमाज पठण चालणार नाही, हिंदू समाज आता जागृत झाला आहे ! 🚩🚩
🚩चलो शनिवार वाडा! 🚩
रविवार, 19 ऑक्टोबर 2025
📍 शनिवार वाडा, कसबा पोलीस चौकीसमोर
🕓 सायंकाळी 4 वाजता
---
🔥 पुण्याचे वैभव – शनिवार वाडा
ऐतिहासिक वारसा स्थळ की गैर हिंदू प्रार्थना स्थळ?
सारसबाग येथे… pic.twitter.com/EObcXMZ6Rt
— Dr. Medha Kulkarni (@Medha_kulkarni) October 19, 2025
advertisement
या सर्व घडामोडींनंतर, पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून रात्री उशिरा विश्रामबाग पोलिसांना अधिकृत तक्रार प्राप्त झाली. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तातडीने अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी विश्रामबाग पोलीस करत आहेत. पोलिसांनी आता या अज्ञात महिलांचा शोध सुरू केला आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिलांची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 20, 2025 10:50 AM IST