मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, खडकीतून इंदूरला TOD स्पेशल ट्रेन, कधीपर्यंत धावणार?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Central Railway: खडकी-इंदूर-खडकी मार्गावरील विशेष गाड्या पूर्वीप्रमाणेच पुढील काही काळ चालवण्यात येणार आहेत. ठरलेले दिवस, थांबे, वेळा आणि डब्यांच्या रचनेसह गाड्या धावतील.
पुणे: उन्हाळी सुट्टीत रेल्वे प्रवाशांची संख्या मोठी असते. गावी जाण्यासाठी आणि पर्यटनासाठी देखील अनेकजण बाहेर पडतात. आता मध्य रेल्वेने याच गर्दीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यातील खडकी येथून इंदूरसाठी साप्ताहिक ‘ट्रेन ऑन डिमांड’ विशेष गाडीच्या सेवेचा कालावधी वाढवला आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
कसं असेल वेळापत्रक?
खडकी-इंदूर-खडकी मार्गावरील विशेष गाड्या पूर्वीप्रमाणेच पुढील काही काळ चालवण्यात येणार आहेत. ठरलेले दिवस, थांबे, वेळा आणि डब्यांच्या रचनेसह गाड्या धावतील. दर गुरुवारी धावणारी खडकी-इंदूर साप्ताहिक विशेष गाडी (क्रमांक 09323) पूर्वी 26 मार्च 2026 पर्यंत चालवण्यात येत होती. आता या गाडीचा कालावधी वाढवून 2 एप्रिल 2026 ते 30 जुलै 2026 पर्यंत करण्यात आला आहे.
advertisement
दर बुधवारी इंदूरहून खडकीकडे जाणारी गाडी क्रमांक 09324 ही पूर्वी 25 मार्च 2026 पर्यंत चालवण्यात येणार होती. आता या गाडीचा कालावधी वाढवण्यात आला असून ती 29 जुलै 2026 पर्यंत धावणार आहे.
आरक्षणाबाबत...
पुण्यातील खडकीहून सुटणाऱ्या गाडी क्रमांक 09323 च्या वाढीव फेऱ्यांसाठी 31 मार्च 2026 पासून आरक्षण सुविधा सुरू होईल. ही सुविधा सर्व संगणकीकृत पीआरएस केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू होणार आहे. तर अनारक्षित डब्यांसाठी युटीएस प्रणालीद्वारे, म्हणजेच युटीएस ॲप किंवा तिकीट खिडक्यांवरून तिकीट उपलब्ध होईल. त्यासाठी नेहमीप्रमाणे सुपरफास्ट मेल किंवा एक्सप्रेस गाड्यांचे लागू शुल्क आकारले जाईल.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 31, 2026 3:33 PM IST






