advertisement

रेल्वेकडून खान्देशाला मोठं गिफ्ट; मुंबईवरून प्रवास कायमचा झाला सोपा अन् सुसाट, तिकीट दराबाबती आली मोठी अपडेट

Last Updated:

Dadar-Bhusawal Train Update : जर आता तुम्हीही दादार-भुसावळ ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या या ट्रेनबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे.

दादर-भुसावळ एक्स्प्रेस आता कायमस्वरूपी धावणार
दादर-भुसावळ एक्स्प्रेस आता कायमस्वरूपी धावणार
मुंबई : खान्देशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक निर्णय पश्चिम रेल्वेकडून घेण्यात आला आहे. दादर ते भुसावळ दरम्यान धावणारी त्रिसाप्ताहिक विशेष गाडी ही आता कायमस्वरूपी गाडी म्हणून सुरू राहणार आहे. मात्र यापूर्वी ही गाडी स्पेशल म्हणून चालवली जात होती .पण आता तिला नियमित गाडीचा दर्जा देण्यात आला आहे.
प्रवाशांची मोठी चिंता मिटली
आजवर ही गाडी काही कालावधीसाठीच चालवली जात होती आणि वेळोवेळी तिची मुदत वाढवली जात होती. मात्र जळगाव, धुळे आणि नंदुरबार या भागातील प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत होता. तसेच कायमस्वरूपी गाडीची मागणी सातत्याने होत होती. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
तिकीट दराबाबत नवा निमय
या निर्णयामुळे आता प्रवाशांना आर्थिक फायदाही होणार आहे. कारण गाडी नियमित झाल्यानंतर तिकीट दरात सुमारे 20 ते 25 टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे.या सर्वांमुळे नोकरी करणारे, विद्यार्थी, व्यापारी आणि रुग्ण यांना प्रवास अधिक स्वस्त आणि सोयीचा होईल.
advertisement
जाणून घ्या वेळापत्रक
ही गाडी आठवड्यातून तीन दिवस म्हणजे सोमवार, बुधवार आणि शनिवारी धावणार आहे. त्यामुळे मुंबई ते भुसावळ दरम्यान प्रवास करणे अधिक सोपे होईल तसेच भविष्यात या गाडीच्या फेऱ्या वाढवण्याचाही विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
रेल्वेकडून खान्देशाला मोठं गिफ्ट; मुंबईवरून प्रवास कायमचा झाला सोपा अन् सुसाट, तिकीट दराबाबती आली मोठी अपडेट
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement