Fashion Tips : लाल, काळा, निळा, पिवळा.. वेगवेगळ्या रंगाच्या साड्यांसोबत कोणत्या रंगाची ज्वेलरी घालावी?
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Saree and jewelry guide : आता तर लग्नसराई आहे. त्यामुळे साडी हमखास नेसलीच जाते. पण बऱ्याचदा आपल्याला त्या साड्यांवर दागिने कोणते घालावे किंवा कोणत्या रंगांचे घालावे हे कळत नाही.
मुंबई : भारतीय मुलींना साडीचं महत्त्व वेगळं सांगण्याची गरज नाही. बहुतांश मुलींना कधी ना कधी साडी नेसाविशी वाटतेच. साडीमध्ये मुलींच सौंदर्य आणखी खुलतं. आता तर लग्नसराई आहे. त्यामुळे साडी हमखास नेसलीच जाते. पण बऱ्याचदा आपल्याला त्या साड्यांवर दागिने कोणते घालावे किंवा कोणत्या रंगांचे घालावे हे कळत नाही.
पण तुमच्या या प्रोब्लेमवर एका इंफ्लून्सरने बेस्ट सोल्युशन दिलं आहे. इन्स्टाग्रामवर made_bysheetal या अकाऊंटवरून इन्फ्लुएन्सरने कोणत्या रंगाच्या साडीवर कोणत्या रंगाची ज्वेलरी घालावी याबद्दल माहिती दिली आहे. तिने सांगितलेले काँबिनेशन्स खरंच खूप सिम्पल आणि फायदेशीर आहेत. याने तुमचा साडी लूक आणखी खुलेल.
साडीच्या रंगानुसार असा ठरवा दागिन्यांचा रंग..
लाल साडी : लाल साडीवर तुम्ही गोल्ड दागिने किंवा कुंदनचा सेट घालू शकता. याने तुम्हाला खूप छान आणि रॉयल लूक मिळेल.
advertisement
काळी साडी : एव्हरग्रीन असलेल्या काळ्या साडीवर तुम्ही डायमंड सेट किंवा सिल्व्हर ज्वेलरी घालू शकता. यानेही तुम्हाला क्लासी आणि एलिगंट लूक मिळेल.
हिरवी साडी : हिरव्या साडीवर तुम्ही टेम्पल ज्वेलरी घालू शकता. याचबत हिरव्या साडीवर अँटिक गोल्ड ज्वेलरीही खूप उठून दिसते. याने तुम्हाला सुंदर आणि ट्रेडिशनल लूक मिळेल.
निळी साडी : निळ्या साडीवर तुम्ही सिल्व्हर किंवा डायमंड ज्वेलरी घालू शकता. तसेच या साडीसोबत व्हाईट स्टोन ज्वेलरीदेखील खूप छान दिसते. याने तुम्हाला एकदम मॉडर्न आणि एलिगंट लूक मिळेल.
advertisement
गुलाबी साडी : गुलाबी साडीवर पर्ल ज्वेलरी किंवा रोज गोल्ड ज्वेलरी खूप छान दिसते. याने तुम्हाला एकदम सॉफ्ट, एलिगंट लूक आणि फेमिनाईन एनर्जी मिळेल.
पिवळी साडी : पिवळ्या साडीवर ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी किंवा अँटिक गोल्ड ज्वेलरी खूप छान दिसते. आणि त्या पिवळ्या रानगाला खूप छान कॉम्प्लिमेंट करते.
advertisement
पांढरी साडी : पांढऱ्या साडीवर तुम्ही इमराल्ड किंवा रुबी स्टोन ज्वेलरी घालू शकता. पाद्वहत्य साडीवर ही ज्वेलरी खूप जास्त उठून दिसते. तसेच खूप क्लासी आणि रॉयल लूक तुम्हाला मिळतो.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 30, 2026 2:33 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Fashion Tips : लाल, काळा, निळा, पिवळा.. वेगवेगळ्या रंगाच्या साड्यांसोबत कोणत्या रंगाची ज्वेलरी घालावी?










