advertisement

त्वचा नाही शरीरावर खोल भेगा, काय आहे हा दुर्मीळ आजार, जो महाराष्ट्रातल्या नवजात बाळात आढळला

Last Updated:

गडचिरोली जिल्हा महिला व बाल रुग्णालयात हार्लेक्विन इचथिओसिस असलेले नवजात बाळ जन्माला आले असून मृत्यूशी झुंज देत आहे, डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत.

News18
News18
नवजात बाळ येणार याचा आनंद काही वेगळाच असतो, मात्र ते जन्माला येताच जगण्यासाठी सगळ्यात मोठा संघर्ष करावा लागणं आणि त्यातून सुखरुप वाचणं हे मोठं आव्हान चिमुकल्यासमोर आहे. गडचिरोली जिल्हा महिला व बाल रुग्णालयात अत्यंत दुर्मीळ आजार असलेल्या नवजात बाळाचा जन्म झाला. ज्याची अवस्था पाहून अनुभवी डॉक्टरांचेही डोळे पाणावले. नवजात बाळ आल्याचा आनंद साजरा करायचा की त्याला जो आजार झालाय त्याचं दु:ख करावं असा प्रश्न कुटुंबियांसमोर आहे. अत्यंत दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या हार्लेक्विन इचथिओसिस या आजाराने ग्रस्त असलेल्या या बाळाची सध्या मृत्यूशी झुंज सुरू आहे.
काय आहे हा भयानक आजार?
वैद्यकीय परिभाषेत याला हार्लेक्विन इचथिओसिस म्हणतात. हा आजार इतका दुर्मीळ आहे की, साधारणपणे ३ लाख प्रसूतींमागे एखादंच असं प्रकरण समोर येतं. या आजारात जन्माला येणाऱ्या बाळाच्या शरीरावर नैसर्गिक त्वचा नसतेच. त्याऐवजी अंगावर पांढऱ्या रंगाच्या जाड, कठीण आणि एखाद्या कवचासारख्या प्लेट्स असतात. शरीरावर इतक्या खोल भेगा असतात की, त्यातून रक्तस्राव होण्याचा आणि संसर्गाचा मोठा धोका असतो.
advertisement
श्वास घेणंही कठीण!
जनुकीय बिघाडामुळे ABCA12 होणाऱ्या या आजारात बाळाला साधी हालचाल करणं किंवा श्वास घेणंही जिकिरीचं होतं. आरमोरी तालुक्यातील एका मातेने बाळाला जन्म दिला, मात्र जन्मानंतरचं त्याचं रूप पाहून डॉक्टरही घाबरले. बाळाचे डोळे आणि ओठ बाहेरच्या बाजूला उलटलेले असून, त्याला सध्या विशेष अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी सांगितलं की, "या बाळांच्या शरीरातील पाणी झपाट्याने कमी होतं, त्यामुळे त्यांना २४ तास कृत्रिम आर्द्रता असलेल्या वातावरणात ठेवणं गरजेचं असतं."
advertisement
हार्लेक्विन इचिथायोसिस असलेल्या अर्भकांमध्ये मृत्युदर जास्त असतो आणि त्यांची प्रकृती गंभीर असते; त्यामुळे बहुतेक नवजात अर्भके जन्मानंतर लगेचच संसर्ग, उष्णतेचा अभाव, निर्जलीकरण, इलेक्ट्रोलाइट असंतुलन किंवा श्वसन त्रासामुळे दगावतात.
धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या ८ वर्षांत गडचिरोलीत अशा प्रकारची ही चौथी घटना आहे. यापूर्वी जन्मलेल्या तिन्ही बालकांचा संसर्गामुळे जन्मानंतर काही तासांतच मृत्यू झाला होता. त्यामुळे या चौथ्या जिवाला वाचवणं हे डॉक्टरांसाठी एक मोठं आव्हान आहे. संपूर्ण वैद्यकीय पथक सध्या या इवल्याशा जिवासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
त्वचा नाही शरीरावर खोल भेगा, काय आहे हा दुर्मीळ आजार, जो महाराष्ट्रातल्या नवजात बाळात आढळला
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement