Pune Crime: पुण्यात किरकोळ वादातून रक्तरंजित थरार! पत्ता न सांगितल्यानं तरुणाच्या डोक्यात घातला मोठा दगड

Last Updated:

आरोपींपैकी सचिन पवार याने रितेशला "संख्या" नावाचा मुलगा कुठे आहे, अशी विचारणा केली. रितेशने आपल्याला त्याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगताच आरोपींचा पारा चढला

वादानंतर तरुणाला दगडानं मारलं (AI Image)
वादानंतर तरुणाला दगडानं मारलं (AI Image)
पुणे : चाकण परिसरात एका तरुणावर केवळ माहिती दिली नाही म्हणून प्राणघातक हल्ला झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आपला मित्र कोठे आहे, हे न सांगितल्याच्या रागातून तीन जणांनी मिळून एका २३ वर्षीय तरुणाला दगडाने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी चाकण पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नेमका वाद कशावरून झाला?
फिर्यादी रितेश सुरेश उजबळे (२३, मूळ रा. लातूर, सध्या रा. चाकण) हे बुधवारी दुपारी राणुबाई मळा परिसरात असताना ही घटना घडली. आरोपींपैकी सचिन पवार याने रितेशला "संख्या" नावाचा मुलगा कुठे आहे, अशी विचारणा केली. रितेशने आपल्याला त्याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगताच आरोपींचा पारा चढला. माहिती लपवत असल्याचा संशय घेऊन त्यांनी रितेशला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
advertisement
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपी सचिन पवारने जवळच पडलेला एक मोठा दगड रितेशच्या डोक्यात घातला. या हल्ल्यात रितेशचे डोके फुटून तो रक्ताळला, त्याला उपचारादरम्यान दोन टाके पडले आहेत. यावेळी सचिनसोबत असलेल्या ऋषिकेश भोईर आणि सौरभ पवार या दोघांनीही रितेशला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
या हल्ल्यानंतर रितेशने चाकण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी ऋषिकेश बापूसाहेब भोईर, सौरभ गंगाधर पवार आणि सचिन गंगाधर पवार या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. किरकोळ कारणावरून तरुणावर अशा प्रकारे हल्ला झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: पुण्यात किरकोळ वादातून रक्तरंजित थरार! पत्ता न सांगितल्यानं तरुणाच्या डोक्यात घातला मोठा दगड
Next Article
advertisement
KDMC Election: कल्याण-डोंबिवलीत युतीचे ११ उमेदवार बिनविरोध,  मनसे-ठाकरे गटासह काँग्रेसचा हातभार! पडद्यामागची Inside Story
कडोंमपात युतीचे ११ जण बिनविरोध, मनसेसह ठाकरे गटाचाही हातभार, Inside Story
  • कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजप आणि शिंदे गटाच्या युतीचे ११ उमेदवार बिनविरोध निव

  • बिनविरोध निवडणुकीमागे स्थानिक राजकारण, नेते महत्त्वाचे असल्याचे म्हटले जात आहे.

  • महत्वाची भूमिका मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी बजावली

View All
advertisement