Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti : छत्रपती संभाजीराजेंचा पुण्यातील पहिला पुतळा कसा उभा राहिला? हा इतिहास तुम्हाला माहितीये का?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हा पहिला पूर्णकृती पुतळा मानला जातो. 1986 साली या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली.
पुणे : पुण्याच्या डेक्कन जिमखाना परिसरात उभारलेला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हा पहिला पूर्णकृती पुतळा मानला जातो. 1986 साली या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रातील विविध भागांत संभाजी महाराजांचे पुतळे उभारले गेले, मात्र या पहिल्या पुतळ्याचे खास महत्त्व आहे.
या पुतळ्याच्या उभारणीत सुरेश नाशिककर यांचे मोलाचे योगदान आहे. 1978 साली एका वर्तमानपत्रात आलेल्या लेखावरून त्यांचे लक्ष संभाजी महाराजांच्या चरित्राकडे वेधले गेले. ते केवळ युद्धात पराक्रमी नव्हते, तर एक विद्वान संस्कृत पंडित व धर्मरक्षक होते. मात्र, इतिहासात त्यांची चुकीची प्रतिमा तयार करण्यात आली होती. त्यामुळे ही प्रतिमा बदलण्यासाठी नाशिककर यांनी धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानची स्थापना केली.
advertisement
काही वर्षांनी वर्गणी गोळा करून स्मारक समिती स्थापन करण्यात आली. शिल्पकार शोधून मूर्ती तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. साधारणतः सव्वा लाख रुपयांचा खर्च करून हा पुतळा उभारण्यात आला. यासाठी प्रसिद्ध इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांचेही मार्गदर्शन लाभले.
advertisement
हा पूर्णकृती पुतळा सुमारे 9 फूट उंच असून, त्याचे डोळे, हात, उभे राहण्याची शैली आणि पेहराव यामुळे तो अत्यंत प्रभावी दिसतो. समाजमनावर खोल परिणाम करणारा हा पुतळा तब्बल तीन वर्षांच्या मेहनतीनंतर साकारण्यात आला. संभाजी महाराजांची खरी ओळख समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी ही मूर्ती एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली आहे. आजही हा पुतळा प्रेरणास्थान ठरतो आणि त्यांच्या शौर्याचा साक्षीदार म्हणून उभा आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
May 12, 2025 5:01 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti : छत्रपती संभाजीराजेंचा पुण्यातील पहिला पुतळा कसा उभा राहिला? हा इतिहास तुम्हाला माहितीये का?