CNG Rate Hike: पुण्यात सीएनजीचे दर वाढले, दीड रूपयांची वाढ:, आता सीएनजीचा दर प्रति किलो 85 रूपये
- Published by:Rohit Shinde
Last Updated:
पुण्यात सीएनजीचे दर वाढले आहेत. प्रति किलो दीड रूपयांची वाढ झाली आहे. आता सीएनजीचा दर प्रति किलो 85 रूपये असणार आहेत. त्यामुळे वाहन धारकांच्या खिशाला काही प्रमाणात कात्री लागणार आहे.
पुणे: पुण्यात सीएनजीचे दर वाढले आहेत. प्रति किलो दीड रूपयांची वाढ झाली आहे. आता सीएनजीचा दर प्रति किलो 85 रूपये असणार आहेत. त्यामुळे वाहन धारकांच्या खिशाला काही प्रमाणात कात्री लागणार आहे. बजेटच्या आधी सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याऐवजी CNG दरवाढीच्या रूपाने धक्काच बसला आहे. देशभरात सर्वसामान्य या ना त्या कारणाने महागाईने होरपळत आहे. ग्रामीण भागापासून ते मुंबई, दिल्लीसारख्या मेट्रो शहरापर्यंत सर्वसामान्यांचं बजेट कोलमडत आहे. गाडी चालवण्यापासून ते गृहिणींपर्यंत म्हणजे अगदी स्वयंपाकघरापर्यंत सगळ्याचे दर हे अक्षरश: गगनाला भिडले आहेत. त्यात आता भर म्हणून महानगर गॅस लिमिटेडने नवे दर लागू केले आहेत. जे 9 जुलैपासून सर्वत्र लागू होणार आहेत.
महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने CNG आणि घरगुती पाइपलाइन गॅस (PNG) चे नवीन दर जाहीर करण्यात आले. या दोन्हीच्या किंमती वाढवल्याने आता महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. वाढलेल्या किमती 8 जुलैच्या मध्यरात्रीपासून म्हणजेच 9 जुलै 2024 पासून लागू करण्यात आल्या आहेत.
दिल्लीनंतर मुंबईत सीएनजीच्या किमतीत 1.50 रुपये किलोने वाढ झाली. तर पाइप लाइन गॅसच्या (पीएनजी) किमतीत एक रुपयाने वाढ झाली आहे. प्रामुख्याने कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने दरात वाढ करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
advertisement
सीएनजी आणि पीएनजीचे दर पेट्रोल डिझेल महाग होत असल्याने वाढत आहेत. इतकंच नाही तर घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढत असल्याने पाइपलाईन गॅस घेणं पसंत करतात. त्यामुळे दिवसेंदिवस ही मागणी वाढत आहे. आता वाढत्या मागणीमुळे जास्त खरेदी करावी लागत असल्याने किंमती वाढल्याचं सांगितलं जात आहे.
view comments
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 09, 2024 9:27 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
CNG Rate Hike: पुण्यात सीएनजीचे दर वाढले, दीड रूपयांची वाढ:, आता सीएनजीचा दर प्रति किलो 85 रूपये


