advertisement

आई डांबरीकरणाचं काम करत होती अन् 4 वर्षाचा लेक खेळत होता; पण तो दिवस आर्यनसाठी ठरला अखेरचा, रस्त्यावरच भयंकर घडलं

Last Updated:

सेंट सेबॅस्टियन हायस्कूलच्या मागील बाजूला रस्त्याचे डांबरीकरण सुरू होते. आर्यनची आई या कामावर मजूर म्हणून काम करत होती. काम सुरू असताना रोडरोलरचा चालक अतिशय वेगाने रोलर चालवत होता

रोलरखाली येऊन मृत्यू (AI Image)
रोलरखाली येऊन मृत्यू (AI Image)
पुणे : दौंड शहरातील जनता कॉलनी परिसरात रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू असताना एक हृदयद्रावक घटना घडली आहे. सुसाट वेगाने जाणाऱ्या रोडरोलरखाली चिरडून एका चार वर्षीय चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला. आर्यन संतोष जाधव (वय ४, रा. बारडगाव सुद्रिक, ता. कर्जत) असे मृत बालकाचे नाव आहे.
नेमकी घटना काय?
सेंट सेबॅस्टियन हायस्कूलच्या मागील बाजूला रस्त्याचे डांबरीकरण सुरू होते. आर्यनची आई या कामावर मजूर म्हणून काम करत होती. काम सुरू असताना रोडरोलरचा चालक अतिशय वेगाने रोलर चालवत होता. रोलरच्या वेगाबाबत स्थानिक नागरिकांनी चालकाला हटकले देखील होते, मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. काम संपवत असताना अचानक आर्यन या रोलरखाली आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
अर्धा तास मृतदेह घटनास्थळी: अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला. आपल्या डोळ्यादेखत पोटचा गोळा गेल्याने आईला मोठा मानसिक धक्का बसला आहे. अपघाताच्या तीव्रतेमुळे आर्यनचा मृतदेह तब्बल अर्धा तास घटनास्थळीच पडून होता. अखेर दौंड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रुग्णवाहिका बोलावून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.
advertisement
या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, सार्वजनिक कामांच्या ठिकाणी मजुरांच्या लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली असून फरार चालकाचा शोध सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
आई डांबरीकरणाचं काम करत होती अन् 4 वर्षाचा लेक खेळत होता; पण तो दिवस आर्यनसाठी ठरला अखेरचा, रस्त्यावरच भयंकर घडलं
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement