advertisement

Toll Free : भाविकांसाठी मोठी बातमी; प्रसिद्ध तीर्थक्षेत्र यात्रेनिमित्त वाहनांना टोलमाफी जाहीर

Last Updated:

Toll Free : महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. पण जर तुम्ही स्वता:च्या वाहनाने जाणार असाल तर तुम्हाला त्या गोष्टीचा लाभ मिळणार आहे.

News18
News18
लोणावळा : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वेहेरगाव, कार्ला गड येथील आई एकवीरा देवीचा पालखी सोहळा बुधवारी 25 मार्च पार पडणार आहे. चैत्री यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांनासाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे.
नेमका निर्णय कोणता?
आई एकवीरा देवीचा पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात मानाच्या पालख्यांचे प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत अनेक प्रतिनिधी उपस्थित होते. ज्यातमध्ये पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवर टोलमाफी देण्यात येणार असा निर्णय घेण्यात आलेला आहे.
चैत्री यात्रेदरम्यान 24 मार्च रोजी श्री कालभैरवनाथ देवाची पालखी, 25 मार्च रोजी आई एकवीरा देवीची मुख्य पालखी, 26 मार्च रोजी देवीचा तेलवान आणि मानपान कार्यक्रम होणार आहे तसेच 2 एप्रिल रोजी श्री ढाक कालभैरव आणि भैरवनाथ यांच्या पालखी सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
advertisement
गडावर उसळणार भक्तांचा जनसागर
या यात्रेला हजारो भाविक मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबई आणि कोकण किनारपट्टी भागातून मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. यात्रेदरम्यान मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने पायथा ते कार्ला गड परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान गडावर स्वच्छता राखावी, फटाके वाजवू नयेत तसेच पालख्या दुपारी 1 वाजण्यापूर्वी गडावर आणाव्यात असे आवाहन प्रशासनाने केले आहे. यात्रेला शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी भाविकांनी सहकार्य करावे असेही आवाहन करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Toll Free : भाविकांसाठी मोठी बातमी; प्रसिद्ध तीर्थक्षेत्र यात्रेनिमित्त वाहनांना टोलमाफी जाहीर
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement