BREAKING: पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार, मध्यरात्री घायवळ टोळीकडून भररस्त्यात फायरींग
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
आंदेकर टोळीकडून आयुष कोमकरवर केलेल्या गोळीबाराची घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेनं पुणे हादरलं आहे. मध्यरात्री कोथरूड भागात घायवळ टोळीने गोळीबार केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत. अलीकडेच नाना पेठेत टोळीयुद्धातून १९ वर्षीय आयुष कोमकरची हत्या करण्यात आली होती. आंदेकर टोळीने माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आयुषवर गोळ्या झाडल्या होत्या. पाळत ठेवलेल्या हल्लेखोरांनी तब्बल १२ गोळ्या झाडल्या होत्या. यातील नऊ गोळ्या आयुषला लागल्या होत्या. या धक्कादायक घटनेत आयुष कोमकरचा जागीच मृत्यू झाला होता. आयुष कोमकर हा वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा होता. त्यामुळे आंदेकर टोळीने अशाप्रकारे सूड उगवला होता.
ही गोळीबाराची घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेनं पुणे हादरलं आहे. मध्यरात्री पुण्याच्या कोथरूड भागात गोळीबार झाला आहे. कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या टोळीकडून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. मध्यरात्री कोथरुड भागातून जात असताना गाडीला पुढे जाण्यास साईड न दिल्याच्या कारणातून हा गोळीबार झाल्याचं सांगितलं जातंय.
advertisement
मुसा शेख, रोहित आखाड आणि मयूर कुंभारे अशी गोळीबार करणाऱ्या तीन आरोपींची नावं आहेत. तिघेही बुधवारी रात्री कोथरुड परिसरातून जात होते. यावेळी एका वाहनचालकाने घायवळ टोळीच्या गुंडाना पुढे जाण्यास साईड दिली नाही. याच कारणातून हे तिघे संतापले आणि त्यांनी कारमधील प्रकाश धुमाळ नावाच्या व्यक्तीवर गोळीबार केला. सुरुवातील तीन राऊंड फायर केल्याची माहिती मिळत होती. मात्र आता रात्री एकच राऊड फायरिंग केल्याचं सांगितलं जातंय. ही घटना कोथरूडच्या शिंदे चाळ परिसरात घडली.
advertisement
या गोळीबारात प्रकाश घुमाळ जखमी झाले असून, त्यांच्या पायाला गोळी लागली आहे. जखमीवर पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची आता प्रकृती कशी आहे, याची माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र एकीकडे आंदेकर टोळीने केलेल्या गोळीबाराची घटना ताजी असताना आता घायवळ टोळीने गोळीबार केल्याने पुणेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 18, 2025 6:57 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
BREAKING: पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार, मध्यरात्री घायवळ टोळीकडून भररस्त्यात फायरींग