advertisement

संशयाचं भूत डोक्यात शिरलं; मित्रानेच तरुणाला संपवलं, पुणे हादरलं

Last Updated:

पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
पुणे, 22 डिसेंबर, चंद्रकांत फुंदे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. पुण्यात मित्रानेच मित्राची हत्या केली आहे. बहिणीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून हे हत्याकांड घडल्याची माहिती समोर येत आहे. राजेश कांबळे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे, तर राहुल शेषराव रिकामे आणि सय्यद जमीर उर्फ सहील बाब्या सय्यद असं हत्या केलेल्या दोन आरोपींचं नाव आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की राहुल रिकामे याच्या बहिणीशी राजेश कांबळे या तरुणाचे प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपींना होता. या संशयावरून या दोघांनी राजेश याला बालेवाडीच्या गोल्डन टेरेस सोसायटी जवळ भेटायला बोलावले. त्यानंतर धारदार शस्त्राने त्याच्यावर वार करण्यात आले. या घटनेत राजेशचा मृत्यू झाला. आरोपींनी त्याची हत्या करून मृतदेह वाकडच्या नदीमध्ये फेकून दिला.
advertisement
दरम्यान या प्रकरणात दोन्ही आरोपींविरोधात चतुशिर्गींगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेनं पुण्यात खळबळ उडाली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
संशयाचं भूत डोक्यात शिरलं; मित्रानेच तरुणाला संपवलं, पुणे हादरलं
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement