जेवणाच्या ताटावर बायकोला.., गणेश काळेला कशाची होती भीती? हत्येच्या 48 तास आधीच चाहूल

Last Updated:

Ganesh Kale Case: पुण्यात पुन्हा एकदा गँगवॉरनं डोकं वर काढलं आहे. आंदेकर टोळीने शनिवारी माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खूनाचा दुसरा बदला घेतला.

News18
News18
Ganesh Kale Murder Case: पुण्यात पुन्हा एकदा गँगवॉरनं डोकं वर काढलं आहे. आंदेकर टोळीने शनिवारी माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खूनाचा दुसरा बदला घेतला. दोन महिन्यांपूर्वी आंदेकर टोळीने आयुष कोमकरची हत्या केली होती. त्यानंतर शनिवारी कोंढवा परिसरातील खडी मशीन चौक ते येवलेवाडी दरम्यानच्या पेट्रोल पंपासमोर दुपारी साडेतीनच्या चार जणांनी गणेश काळेचा गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून खून केला. गणेश काळे हा वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी समीर काळेचा भाऊ होता. तो रिक्षा चालक म्हणून काम करत होता. पण समीर काळे सध्या तुरुंगात असल्याने आंदेकर टोळीने त्याच्या भावाला टार्गेट बनवलं.
अमन शेख आणि अरबाज पटेल यांनी दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने हा खून केला. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी अमन शेख, अरबाज पटेल आणि मयूर वाघमारे अशा तीन आरोपींना अटक केली. कोंढवा पोलिसांनी मयत गणेश काळेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला. या हत्या प्रकरणानंतर आता गणेश काळे खून प्रकरणातील महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आपला मर्डर होणार असल्याची चाहूल गणेश काळेला आधीपासूनच लागली होती, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सव काळात आणि मागील 10 ते 15 दिवसांपासून गणेश हा अस्वस्थ असल्याचे त्याच्या वडिलांना जाणवले होते. याबाबत त्यांनी गणेशच्या आईला सांगितले होते. दोन दिवसांपूर्वी रिक्षा चालवून घरी आल्यावर एकत्रित जेवण करत असताना दोघांनी गणेशला त्याबाबत विचारणा केली होती. त्यावेळी गणेशने आपल्या कुटुंबाला आंदेकर टोळीकडून आपला पाठलाग होत असल्याचं सांगितलं होतं.
advertisement
तसेच गणेश काळे गेल्या काही दिवसांपासून प्रचंड दहशतीखाली होता. वनराजच्या टोळीतील लोक सूड घेतील, अशी भीती त्याला सतावत होती. आपली पत्नी आणि आई-वडिलांकडेही त्याने ही भीती व्यक्त केली होती.
‌‘बंडू आंदेकर याने तर स्वतःच्या नातवालाही सोडलं नाही, मग तो मला कशाला सोडेन?’ अशी भीती गणेशनं जेवणाच्या ताटावर आपल्या बायकोकडे आणि आई वडिलांकडे व्यक्त केली होती. यानंतर सर्वांनी मिळून सावधगिरी बाळगण्याचं ठरवलं होतं. त्याचे वडील त्याला रोज फोन करून आणि घरी आल्यावर त्याच्याकडे चौकशी करत होते, परंतु पाठलाग थांबला नसल्याचेही त्याने पुन्हा सांगितले होते.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
जेवणाच्या ताटावर बायकोला.., गणेश काळेला कशाची होती भीती? हत्येच्या 48 तास आधीच चाहूल
Next Article
advertisement
Shiv Sena Candidate List BMC Election: बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
  • भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ

  • शिंदे यांनी आपल्या ६० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

View All
advertisement