advertisement

नितीन देसाईंच्या अनुपस्थितीमध्ये कसं पेललं शिवधनुष्य? कलाकारांनी सांगितला अनुभव

Last Updated:

पुण्यातील 'या' प्रसिद्ध गणेश मंडळाच्या कलाकृतीची संकल्पना नितीन देसाई यांची होती.

+
News18

News18

पुणे, 27 सप्टेंबर :   सुंदर देखावे आणि भक्तांना पावणारा नवसाचा गणपती ही पुण्यातील हुतात्मा बाबू गेनू मंडळ हे खास देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहे.या मंडळानं दरवर्षी एकापेक्षा एक आकर्षक देखावे सादर करत पुणेकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडलंय. यंदाही या मंडळानं चार धाम यात्रेवरील देखावा सादर केलाय. पण, मंडळाच्या कार्यकर्त्यांना एक कमतरता जाणवतीय.
दिवगंत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी या देखाव्याची संकल्पना मांडली होती. मुंबईतला लालबागचा राजा आणि पुण्यातला हुतात्मा बाबू गेनू मंडळाचे गणपती देखावे देसाई गेल्या अनेक वर्षांपासून करत होते. बाबू गेनू मंडळाचा त्यांचा 20 वर्षांपासून संबंध होता. त्यांच्या अकाली मृत्यूनंतर ही जबाबदारी देसाई यांच्या टीमवर आली होती.
advertisement
देसाई यांच्या टीमनं जवळपास 40 कलाकारांच्या मदतीनं या देखाव्याची निर्मिती केलीय. त्यासाठी त्यांना सुमारे अडीच महिने वेळ लागला. नितीन देसाई यांच्या संकल्पनेतील ही शेवटची कलाकृती होती. ही कलाकृती त्यांच्या परंपरेला साजेसी करण्याचं आव्हान होतं. आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करून ही कलाकृती तयार केलीय, अशी भावना देसाई यांचे निकटवर्तीय हेमंत भाटकर यांनी व्यक्त केली.
advertisement
बाप्पाच्या सेवेसाठी आम्ही काम करतोय. नितीन देसाई असे पाऊल उचलतील याचा आयुष्यात कधी विचारही केला नव्हता. आज याप्रसंगी त्यांची फार आठवण येते.नितीन दादा यांच्या जाण्याचे दु:ख तर आहेच पण त्यांच्या शिकवणी नुसार कामाला महत्व देणं हे जास्त महत्वाचं असल्याचं भाटकर यांनी सांगितलं
view comments
मराठी बातम्या/पुणे/
नितीन देसाईंच्या अनुपस्थितीमध्ये कसं पेललं शिवधनुष्य? कलाकारांनी सांगितला अनुभव
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement