पुण्यातील हिंजवडीत तरुणीवर कोयत्याने वार, तिघांनी गाठून केला जीवघेणा हल्ला
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Pune: पुण्यातील हिंजवडी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका तरुणाने आपल्या दोन मित्रांशी संगनमत करून तरुणीवर जीवघेणा हल्ला केला आहे.
पुणे: पुण्यातील हिंजवडी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका तरुणाने आपल्या दोन मित्रांशी संगनमत करून तरुणीवर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे. यातील एक आरोपी अल्पवयीन आहे.
योगेश भालेराव असं हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीचं नाव आहे. तर प्रेम लक्ष्मण वाघमारे आणि अन्य एक अल्पवयीन अशी ताब्यात घेतलेल्या तीन आरोपींची नावं आहेत. तर हल्ला झालेली तरुणी ही आरोपी योगेश भालेरावची प्रेयसी असल्याची माहिती आहे. प्रेम प्रकरणातून झालेल्या वादातून संतापलेल्या योगेशने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने १८ वर्षीय प्रेयसीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे.
advertisement
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमसंबंधातील वाद विकोपाला गेल्यानंतर योगेश भालेराव याने आपल्या दोन साथीदारांना सोबत घेतले. या तिघांनी संगनमत करून तरुणीला गाठले आणि तिच्यावर कोयत्याने हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात तरुणीच्या डोक्यावर, मानेवर आणि हातावर गंभीर वार करण्यात आले. ज्यामुळे ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे हिंजवडी परिसरात मोठी खळबळ उडाली.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तिन्ही संशयित आरोपींना त्वरित ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत, हा सर्व प्रकार प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वैमनस्यातून घडल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. गंभीर जखमी झालेल्या तरुणीला तातडीने हिंजवडी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी तिच्यावर लक्ष ठेवले आहे. तरुणी ही मूळची नाशिकची असून सध्या ती हिंजवडीतील साखरे वस्ती परिसरात वास्तव्याला होती.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 02, 2025 11:10 AM IST


