मविआत बिघाडी? जुन्नरमध्ये थेट सांगली पॅटर्न राबवू, विश्वजित कदमांचा काँग्रेसच्या बैठकीत इशारा
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
विश्वजीत कदम यांनी सत्यशील शेरकर यांच्यासाठी थेट चांगली पॅटर्न राबवू असं म्हणत नव्या वादाला तोंड फोडलं आहे.
चंद्रकांत फुंदे, प्रतिनीधी
पुणे : पुण्यातील काँग्रेस भवन या ठिकाणी विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली आगामी राहुल गांधी यांच्या दौऱ्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते हजर होते. त्याचबरोबर जुन्नर तालुक्यातील काँग्रेसचे युवा नेते असलेले सत्यशील शेरकर हे देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर सत्यशील शेरकर आणि विश्वजीत कदम यांच्यामध्ये जुन्नर विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाली. सत्यशील शेरकर हे जुन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र महाविकास आघाडीमध्ये या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने दावा केला आहे. त्यामुळे सत्यशील शेरकर यांची गोची झाली आहे. यावर चर्चा सुरू असताना विश्वजीत कदम यांनी सत्यशील शेरकर यांच्यासाठी थेट चांगली पॅटर्न राबवू असं म्हणत नव्या वादाला तोंड फोडलं आहे.
advertisement
सत्यशील शेरकर आणि विश्वजीत कदम यांच्यामध्ये चर्चा सुरू असताना सत्यशील शेरकर यांना उद्देशून विश्वजीत कदम म्हणाले, "नाहीतर मग थेट सांगली पॅटर्न, तुझ्यासाठी कोणताही पॅटर्न रबवू... नाहीतर मग तुझ्यासाठी मग नवा पॅटर्न काढू.... आम्ही केल की धाडस". विश्वजीत कदम आणि सत्यशील शेरकर यांच्या या संवादानंतर जुन्नर मध्ये महाविकास आघाडीमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
advertisement
जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अतुल बेनके हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. तर आपण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षातूनच निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केल आहे. तर दुसरीकडे जुन्नर विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने दावा केल्यामुळे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत असणाऱ्या सत्यशील शेरकर यांच्यासमोर मोठ संकट उभा राहिला आहे. मात्र आता विश्वजीत कदम यांनी थेट सत्यशील शेरकर यांच्यासाठी सांगली पॅटर्नच राबवू असं म्हटल्यानंतर जुन्नर विधानसभा मतदार संघात सत्यशील शेरकर हे आणखी ताकतीने कामाला लागले आहेत.
advertisement
काय आहे सांगली पॅटर्न?
view commentsलोकसभा निवडणुकीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून विशाल पाटील हे इच्छुक होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीला विश्वासात न घेता चंद्रहार पाटील यांना उमेदवारी घोषित केली. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये या ठिकाणी बेबनाव निर्माण झाला होता. अखेर विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवला. या निवडणुकीमध्ये विश्वजीत कदम यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली गेली. विश्वजीत कदम हे महाविकास आघाडीच्या मंचावर जरी दिसत असले तरी विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांच्या मैत्रीचे किस्से या निवडणुकीत चर्चीले गेले. त्यामुळे विशाल पाटील यांच्या विजयाचा सांगली पॅटर्न आपण थेट जुन्नर मध्येच राबवू असं विश्वजीत कदम यांनी म्हटल्यानंतर आता राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाची नक्की काय भूमिका असणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 28, 2024 10:45 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
मविआत बिघाडी? जुन्नरमध्ये थेट सांगली पॅटर्न राबवू, विश्वजित कदमांचा काँग्रेसच्या बैठकीत इशारा


