advertisement

Manoj Jarange Patil : लाडक्या बहिणीला पैसे देता, भाच्याच्या आरक्षणाचं आणि दाजीच्या....; जरांगेंची सरकारवर टीका

Last Updated:

Manoj Jarange Patil On Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवर मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली.

News18
News18
सुरेश जाधव, प्रतिनिधी
बीड : राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली. बीडमध्ये एका हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी म्हटलं की, लाडक्या बहिणीला पैसे देता. भाच्याच्या आरक्षणाचं अन्‌‍ दाजीच्या शेतातील मालाच्या भावाचं काय? असा प्रश्नही जरांगेंनी विचारला. फडणवीसांनी वावर विकून पैसे नाही दिले. तुमचे-आमचेच पैसे आहेत. भरा फॉर्म असंही जरांगे म्हणाले. (Manoj Jarange Patil On Ladaki Bahin Yojana )
advertisement
जरांगे पाटलांनी म्हटलं की, आता लाडकी बहीण योजना आणली. बँकेपुढे रांग लागली आहे. चांगली योजना आहे. भरा फॉर्म. पैसेच आपले आहेत. त्यांनी काय वावर विकलं आहे का, असं केलं देवेंद्र फडणवीस यांनी बंगला विकलाय नागपूरचा आणि आपल्याला पैसे दिले. टँक्स, जीएसटीमधून आलेले पैसे आहेत. त्यांनी काही घर विकून पैसे दिले आहेत का, आपले पैसे आपल्याला देत आहेत.
advertisement
लाडक्या बहिणीला पैसे देतांना लाडक्या भाच्याचा विचार केला नाही, त्याला शिक्षण पाहिजे. आयुष्याचं आरक्षण पाहिजे. दिड हजारावर आमचे आयुष्य कडीला जाणार नाही. भाचा तसाच राहीला. बहीणीला पैसे दिले आणि दाजी शेतात काम करतो, त्याच्या मालाला भाव पाहिजे, त्याचं काय? असा सवाल जरांगे पाटील यांनी विचारला.
मी गिअरमध्ये येतच नाही, माझ्या गाडीला गिअर नाही. मी 29 तारखेला ठरवले होते, पाडायचे की निवडून आणायचे, दोघे खुष झाले होते. मी जर उभा करायचं म्हटले तर भाजपवाले खुश होतात. ते म्हणतात आपले आयते निवडून येतात. मी पाडायचं म्हटलं की महाविकास आघाडीवाले म्हणतात बेकारच होतंय. म्हणजे यांचं गणितच मराठ्यावर आहे. मी 29 ला निर्णय घेणार होतो. 29 तारेखला निर्णय घेणार होतो, त्यांनी निवडणूक डिसेंबरपर्यंत ढकलली असंही जरांगे पाटील म्हणाले.
advertisement
जरांगे पाटलांनी म्हटलं की, त्यांना आपले डाव उघडे पाडायचे होते आणि त्याच्यावर त्यांना काम करायचे होते. देवेंद्र फ डणवीस दिल्लीला गेला आणि मी इकडं म्हटले आम्हाला बैठकच नाही घ्यायची, ते तसंच माघारी आलं. मेळच लागेना त्यांना हे काय करतंय.तुम्हाला सांगतो त्यांनी तर माझ्यावर एव्हढा अन्याय केला ना, त्याला तर सुट्टीच नाही. मराठ्यांच्या विरोधात काम करणाराला मी सोडत नाही, तुम्हीही सोडू नका. लय पक्षावर माया करु नका. सगळ्यात जास्त मराठ्यांची मुले सुशिक्षीत बेकार आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Manoj Jarange Patil : लाडक्या बहिणीला पैसे देता, भाच्याच्या आरक्षणाचं आणि दाजीच्या....; जरांगेंची सरकारवर टीका
Next Article
advertisement
WhatsAppला कोर्टाचा दणका, नियम पाळता येत नसेल तर भारत सोडा; भर न्यायालयात 'प्रायव्हसी'चा फुगा फुटला, 213 कोटींचा दंड
WhatsAppला कोर्टाचा दणका, नियम पाळता येत नसेल तर भारत सोडा; 213 कोटींचा दंड
  • WhatsAppच्या प्रायव्हसी पॉलिसीवर कोर्टाचा घणाघात

  • आम्हालाच तुमची पॉलिसी समजत नाही, तर गरिबांचं काय?

  • 213 कोटींचा दंड, तरीही डेटा शेअरिंग

View All
advertisement