advertisement

पुणे-मुंबई प्रवास आता फक्त 48 मिनिटांत! महाराष्ट्रासाठी 2 नवीन बुलेट ट्रेनची घोषणा; पण मुंबई-नागपूर मार्गाचं नेमकं काय झालं?

Last Updated:

नव्या नियोजनानुसार, मुंबई ते पुणे हे अंतर अवघ्या ४८ मिनिटांत कापले जाणार आहे. सध्या या प्रवासाला ३ ते ४ तास लागतात.

महाराष्ट्रासाठी 2 नवीन बुलेट ट्रेनची घोषणा (प्रतिकात्मक फोटो)
महाराष्ट्रासाठी 2 नवीन बुलेट ट्रेनची घोषणा (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई: महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी केंद्र सरकारने मोठी गुड न्यूज दिली आहे. मुंबई-अहमदाबाद नंतर आता राज्यात आणखी दोन हाय-स्पीड बुलेट ट्रेन धावणार आहेत. यामुळे पुणे आणि मुंबईकरांचा प्रवास अतिशय वेगवान होणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद या दोन मार्गांना प्राधान्य देण्यात आले असून, यामुळे आयटी आणि औद्योगिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.
प्रवासाचा वेळ निम्म्यावर
नव्या नियोजनानुसार, मुंबई ते पुणे हे अंतर अवघ्या ४८ मिनिटांत कापले जाणार आहे. सध्या या प्रवासाला ३ ते ४ तास लागतात. तसेच, पुणे ते हैदराबाद हे अंतर केवळ २ तासांत पूर्ण होईल, असा अंदाज आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी ३००० कोटींचे अनुदान आणि २३८ नवीन स्वयंचलित दरवाजांच्या गाड्यांची निर्मितीही वेगाने सुरू आहे.
advertisement
नागपूर-मुंबई मार्गाचे काय?
राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरला जोडणाऱ्या बुलेट ट्रेनची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र, ताज्या घोषणेत पुणे-मुंबई आणि पुणे-हैदराबाद मार्गांना झुकते माप मिळाल्याने विदर्भातील प्रवाशांकडून 'नागपूर-मुंबई मार्गाचं काय झालं?' असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. समृद्धी महामार्गापाठोपाठ या बुलेट ट्रेनची प्रतीक्षा आता अधिक वाढली आहे.
देशातील पहिल्या समुद्राखालील २१ किमी लांबीच्या बोगद्याचे काम वेगाने सुरू असून, १७ नद्यांवरील पुलांचे कामही प्रगतीपथावर आहे. ७ पैकी ५ किमी बोगद्याचे काम पूर्ण झाले असून, लवकरच भारतीय रेल्वेचे रूप पालटलेले दिसेल.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणे-मुंबई प्रवास आता फक्त 48 मिनिटांत! महाराष्ट्रासाठी 2 नवीन बुलेट ट्रेनची घोषणा; पण मुंबई-नागपूर मार्गाचं नेमकं काय झालं?
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement